ग्रा.पं. मालेवाडा व गु.से.मं.यांच्या सहकार्यातून मार्ग साकारला

229

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
मागील दोन दिवस परिसरात चांगला पाऊस पडला. त्यामुळे मालेवाडा ते चरविदंड (व्हाया टिपागडी नदी) पर्यंत जाणारा रस्ता संपूर्ण चिखलमय झाला असून रहदारी करणे शक्य नव्हते. मात्र नागरिकांसाठी हाच रस्ता नियमित असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करत चिखलातून मार्ग काढावा लागत होता.
यावर उपाय शोधत ग्रा. पं. मालेवाडा व गुरुदेव सेवा मंडळ मालेवाडा यांच्या निस्वार्थ सेवेतून रस्त्यावर रेती टाकून रस्ता रहदारी करण्यायोग्य बनवला. यामुळे या रस्त्यावरून आता सहज ये-जा करणे शक्य झाले आहे. याआधी सुद्धा ग्रामपंचायत व गुरुदेव सेवा मंडळच्या सदस्यांनी अनेक समाजोपयोगी कार्य साध्य केले आहेत.
या कार्यात सरपंच आनंदरावजी बोगा, मनोज लेंगरे उपसरपंच, तुळशीदासजी बोगा माजी सदस्य पं.स. कुरखेडा, गुणाजी गावतुरे अध्यक्ष तंमुस, कृष्णाजी उईके सचिव ग्रामपंचायत मालेवाडा, रोहिदास उईके अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, इतर सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.