पाटनसावंगी येथील सद्भावना वेकोलि कॉलोनीतील 70 वर्षीय वृद्धेचा मृत्यू, मृत्यूनंतर अहवालात वृद्ध महिला आढळली कोरोना पॉसिटीव्ह

पूजा उईके  तालुका प्रतिनिधी

सावनेर :पाटणसावंगी येथील सद्भावना वेकोलि कॉलोनीतील 70 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. त्यांची 4 ऑगस्ट ला मृत्यू झाली. मृत्यूनंतर घेतलेल्या अहवालात ती कोरोना पॉसिटीव्ह आढळली. मृत वृद्ध महिला ही अनेक वर्षांपासून आजारी होती पण त्रास जास्त वाढल्याने तिला 3 ऑगस्ट ला वेकोलितील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तिथे तिची गंभीर अवस्था बघता तेथील डॉक्टरांनी नागपूरच्या मेयो हॉस्पिटलात पाठविण्याचे sangitle. नागपूरला नेट असतानाच तिचा मेयो हॉस्पिटल जाण्याआधीच रस्त्यातच त्यांची मृत्यू झाली. मेयोमध्ये आरोग्य विभागातर्फे मृत वृद्ध महिलेची तपासणी केली असता तिचा अहवाल पॉसिटीव्ह आला. मृत कोरोना रुग्णांच्या नियमानुसार तिचावर शासनातर्फे नागपूरला अंतिम संस्कार करण्यात आले. आता प्रशासन या मृत वृद्धेचा संपर्कात आलेल्या व्यक्तींचे शोध घेणे सुरु आहे.