Home महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू राजापूरमध्ये झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू...

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू राजापूरमध्ये झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू मुंबई-गोवा महामार्ग ठप्प बाव नदीने ओलांडली धोक्याची पातळी

393

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : मुसळधार पावसाने राजापूर तालुक्यातील प्रिंदावन मानवाडीतील शिल्पा शंकर धुरी, वय ४५ यांच्या अंगावर फणसाचे झाड कोसळुन ती गतप्राण झाल्याची घटना घडली आहे. तर दोनिवडे येथील संतोष हरिश्चंद्र कुळी यांचा बैल आलेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात अनेक ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या आहेत. सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून त्यामध्ये पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील प्रिंदावन मधील मानवाडीतील एका महिलेच्या अंगावर फणसाचे झाड कोसळुन ती गतप्राण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान घडली .यातील मयत महिलेचे नाव शिल्पा शंकर धुरी, वय ४५ असल्याची माहिती महसुल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. काही ठिकाणी घरावर झाड कोसळने डोंगर भागात संरक्षक भिंत कोसळली आहे .दत्तवाडीत एका घरावर झाड कोसळुन अंशत नुकसान झाले आहे पाचलसह अन्य ठिकाणी पुराचे पाणी भरल्याच्या घटना घडल्या आहेत दोनिवडे येथील संतोश कुळ्ये यांचा एक बैल वहाळाला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे सुरु झाले आहेत. राजापूर बाजारपेठ, पाण्यात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदीच्या पाण्याने धोक्याची पातळी गाठल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. निवळी घाटाच्या पायथ्याला असलेला बावनदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. बावनदीला पूर आल्याने पोलिसांनी ब्रिटिशकालीन पुलावरील वाहतूक रोखली आहे. बावनदीच्या पाण्याची धोक्याची पातळी 11 मी इतकी आहे मात्र आता 11.30 मी इतके पाणी आहे. पुलावरील वाहतूक रोखल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोकणात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चांदेराई बाजारपेठ देखील पाण्याखाली आहे तेथील पाण्याची पातळी वाढत आहे मार्गावरील वाहतूक बंद आहे आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक भागात पाण्याची पातळी वाढू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleकोरची येथे चक्काजाम आंदोलनास प्रारंभ समस्येचे निराकरण होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही- आ.कृष्णा गजबे
Next articleआमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र भरातील ग्रंथालयाचे अनुदानाचे प्रश्न सुटले – शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे थकीत अनुदान होणार वितरित