कोरची येथे चक्काजाम आंदोलनास प्रारंभ समस्येचे निराकरण होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही- आ.कृष्णा गजबे

180

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

कोरची – अखंडित वीज पुरवठा करण्यात यावा तसेच अन्य समस्या सोडवण्यात याव्यात या मागणीकडे प्रशासनाने लक्ष देण्यासाठी कोरची तालुका सर्वपक्षीय आंदोलन समितीच्या वतीने आज ०४ ऑगस्ट रोजी झनकारगोंदी फाट्यावर बेमुदत चक्काजाम आंदोलनास प्रारंभ करण्यात आला रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते समस्येचे निवारण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे आंदोलनास प्रारंभ होताच येथील विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे व कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी या आंदोलनात येऊन आंदोनकर्त्यासोबत चर्चा केली परंतु समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे त्यांना परत पाठवण्यात आले तसेच भारतीय दूरसंचार निगम गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हा प्रबंधक यशवंतराव घोनाडे व देसाईगंज येथील कनिष्ठ दूरसंचार अभियंता आशिष डोंगरे यांना ही माघार घ्यावा लागला तालुक्याला नेहमी विकासाच्या नावाखाली डावलले जाते दिवसाला १६ ते १८ तास विद्युत सेवा खंडित असते अशा परिस्थितीत तालुक्यातील नागरिक कशा प्रकारे आपले दिवस काढतात हे सांगणे खूप कठीण आहे अशी भावना आंदोलन कर्त्यांनी व्यक्त केली रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्त्यांचा समाधान न झाल्यामुळे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे या आंदोलनात सर्वपक्षीय तालुका विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष श्यामलाल मडावी उपाध्यक्ष नश्रुभाई भामानी सचिव नंदकिशोर वैरागडे सचिव आनंद चौबे कोषाध्यक्ष मनोज अग्रवाल पंचायत समिती सभापती श्रावण मातलाम आंदोलन करते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.