Home नागपूर कोराडी येथील राममंदिराबाबत श्रीराम मंदिर ट्रस्टचा खुलासा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

कोराडी येथील राममंदिराबाबत श्रीराम मंदिर ट्रस्टचा खुलासा माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाबतीत अपप्रचार; राममंदिराचे स्थलांतर झाले असुन मंदिरनिर्माण चे 70% काम पुर्ण

302

 

कोराडी / नागपुर: 5 अगस्त 2020
नागपुर जिल्ह्यातील कोराडी जगदंबा देवस्थान च्या बाजुला असलेल्या तलावाच्या काठावर असलेल्या राममंदिरास तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाडले असा आरोप विविध सोशल मीडिया ग्रुप वर कालपासून सुरु होता. त्या पार्श्वभूमीवर आज कोराडी येथील श्रीक्षेत्र श्रीराम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रामबाबू तोडवाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खुलासा केला असुन त्यांच्या मते राममंदिराचे स्थलांतर केले आहे.
श्रीराम मंदिर ट्रस्ट, कोराडी चे विश्वस्त रामबाबू तोडवाल यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोराडी येथील राममंदिराबाबत काही विघ्नसंतोषी व समाजविघातक प्रव्रृत्तीची मंडळी सोशल मीडिया वर अपप्रचार करीत आहेत. सर्वसामान्य नागरिक आणि श्रीराम यांच्या भक्तात कुठलाही संभ्रम राहु नये म्हणून वस्तुस्थिती काय आहे हे प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करीत आहेत. महालक्ष्मी जगदंबा देवस्थानाला पर्यटनस्थळाचा ब वर्ग दर्जा मिळाला आहे. देवस्थानाच्या पुनर्वसन आराखड्यानुसार महाजेनको तलावाच्या काठावर असलेल्या श्रीराम मंदिराचे कोराडी जगदंबा देवस्थानाच्या मागे नवीन जागेवर स्थलांतर करण्याकरिता मंदिर निर्माणाचे कार्य प्रगतीपथावर असुन यांतील मंदिर निर्माणाचे 70% निर्माण कार्य झाले असुन 2021 च्या श्रीराम नवमी पुर्वी मंदिराचे कार्य पुर्ण होऊन जुन्या मंदिरातील श्रीराम यांच्या मुर्तीची प्रतिस्ठापना श्रीराम नवमी ला होऊन त्याच दिवशी पासून मंदिर भक्तांसाठी खुले होणार असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की श्रीराम मंदिर निर्माणासाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या कल्पक नेत्रृत्वाखाली श्रीराम मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. बावनकुळे हे धार्मिक व्रृत्तीचे असुन त्यांनी अनेक धार्मिक संस्थांना मदत केली असुन त्यांच्या प्रयत्नामुळेच अनेक धार्मिक स्थळे पुर्णत्वास गेले आहे. या स्थळांच्या विकासासाठी बावनकुळे अहोरात्र झटत आहेत परंतु काही विघ्नसंतोषी बावनकुळे यांच्या बाबतीत अपप्रचार करीत आहेत. श्रीराम मंदिराचे कार्य ज्या दिवशी पुर्णत्वास जाईल त्या दिवशी बावनकुळे यांच्या धार्मिक कार्यात अजुन एक मानाचे कार्य जोडले जाईल असे या प्रसिद्धीपत्रकाद्वारे विश्वस्त रामबाबू तोडवाल (माजी गटनेता, महादुला नगरपंचायत) यांनी स्पष्ट केले आहे.

Previous articleसर्वसामान्याचं काम अडेल तेव्हा तुमची आठवण येईल साहेब.निलेश बोरूडे पत्रकार
Next articleकोरची येथे चक्काजाम आंदोलनास प्रारंभ समस्येचे निराकरण होणार नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही- आ.कृष्णा गजबे