अबब! गांधीनगर गाव बनले देशी दारूची भट्टी

321

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत

गांधीनगर – देसाईगंज तालुक्यातील गांधीनगर गावात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात दारू विकल्या जात असल्याची जनमानसात चर्चा. कोरोना काळात भरमसाठ रित्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून इटीयाडोह कालवा मार्गाने भर दिवसा अवैध दारूची तस्करी होत असल्याचे सांगितले जात आहे. याच मार्गाने देसाईगंज तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात दारू ची भरमसाठ रित्या तस्करी केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे, या मार्गाला नाही पोलीस चौकी, कोणी अडवणार वाली नाही, यामुळे या मार्गाने दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केल्या जात आहे. यामध्ये गांधीनगर येथील नामवंत लोक आणि किराणा दुकानदार सुद्धा दारू विक्री करीत असल्याचे जनमानसात दांभिक आवाजात बोलल्या जात आहे. गांधीनगर गावात यापूर्वी दारू विक्री आणि दारू पिण्यास पूर्णपणे बंदी घातली होती. पण आज गांधीनगर गाव हे दारूची भट्टीच झाली असल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे. गांधीनगर येथे चौका चौकात दारू विक्री सुरू असून यांच्याकडे कुणाचेही लक्ष नाही. घराघरामध्ये भांडण सुरू असते. याला कारणीभूत ही दारू आहे असे जनमानासाकडून सांगितले जात आहे. याकडे प्रशासनाने गंभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.