Home नीरा नरसिंहपूर ह. भ. प आबा  उगलमोगले यांची विश्व वारकरी सेना संघटनेच्या पुणे जिल्हा...

ह. भ. प आबा  उगलमोगले यांची विश्व वारकरी सेना संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड  —–:इंदापूर तालुक्यातील अनेक मान्यवरांकडून सामाजिक , शैक्षणिक, कला,  क्रीडा, नाट्य , सांस्कृतिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव:—–

160

 

दिनांक 4 इंदापूर तालुका प्रतिनिधी , बाळासाहेब सुतार, 

लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील  ह. भ. प .आबा  महाराज उगलमोगले यांची (दि.२ ) रोजी विश्व वारकरी सेना या संघटनेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली असून विश्व वारकरी सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. अरुण विष्णुपंत बुरघाटे,  राष्ट्रीय जेष्ठ अध्यक्ष ह.भ.प. तुकाराम  पंढरीनाथ चवरे ,  राष्ट्रीय युवक अध्यक्ष जगन्नाथ शेषराव देशमुख ,  महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष गणेश महाराज शेटे, पुणे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प बापुसाहेब ढगे महाराज, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष,  ह.भ.प महादेव महाराज शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सांप्रदायिक व सामाजिक कार्य याची दखल घेऊन वरील मान्यवरांच्या उपस्थित विश्व वारकरी सेना या संघटनेच्या पुणे जिल्हा उपअध्यक्ष पदी ह. भ .प आबा महाराज उगलमोगले यांची निवड करण्यात आली असून ह. भ .प आबा महाराज उगलमोगले हे शेतकरी, वारकरी संप्रदायातील कुटुंबातील असून आणि लाखेवाडी गावातील  एक वारकरी संप्रदायातील घराणे म्हणून ओळखलं जाते .

सामाजिक कार्य असो , राजकीय असो , समाजसेवा असो , शैक्षणिक असो सर्व कार्यामध्ये आबा महाराज यांचा सहभाग असतो.

लाखेवाडी गावामध्ये अनेक   सामाजिक उपक्रम राबवत असतात. सामाजिक,  राजकीय , शैक्षणिक,  पत्रकार या क्षेत्रामध्ये हे काम करत असतात अशा या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाची निवड झाल्याबद्दल लाखेवाडी  गाव आणि  इंदापूर तालुक्यातून राजकीय, सामाजिक,  कला,  क्रीडा,  शैक्षणिक , नाट्य , सांस्कृतिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून इंदापूर तालुक्यातील वारकरी सांप्रदायिक मंडळींच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आमचे प्रतिनिधी  यांनी आबा महाराज उगलमोगले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता वारकऱ्यांच्या अनेक समस्या असून या समस्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करून वारकरी सांप्रदायिक व वारकरी मंडळींना न्याय देण्याचं काम करणार असून थोड्या दिवसांमध्ये इंदापुर मध्ये एक सुंदर कार्यक्रम घेणार असून  त्याचा शुभारंभ करणार आहे असे आमचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करताना सांगितले आहे.

_________________________________

[] चौकट :-

*धर्माचे पालन | करणे पाखंड खंडन || हेच आम्हा करणे काम || बीज वाढ वावे || तुकोबाराय ||*

या तुकाराम महाराज यांच्या ओवी प्रमाणे या मानवी जीवनात आपण या पृथ्वीवर जेवढे मानव आहेत त्या मानवाचे काहीतरी देणे लागतो . आयुष्यात माणसाने माणसासाठी काही तरी चांगलं काम  करावं.  सामाजिक , राजकीय , कला,  क्रीडा,  नाट्य , संस्कृती, पत्रकार  आशा  अनेक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि हि आपली सामाजिक बांधिलकी आहे. आपलं कर्तव्य आहे या उद्देशाने जी  संघटनेने माझ्यावरती जबाबदारी दिली ती मी निपक्ष,  निस्वार्थ मनात कुठलाही संकोच न ठेवता केवळ समाजासाठी आणि ह्या वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळीच्या अडचणीसाठी सोडवण्यासाठी काम करेल असे ह.भ.प.  आबा महाराज उगलमोगले यांनी आपले मत व्यक्त केले.

फोटो:- ओळी- ह भ प आबा साहेब उगलमोगले  महाराज

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160

Previous articleमाजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गोंदी या ठिकाणी  विविध कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
Next articleशिवसेना खडकवासला महिला आघाडीच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी.