बिग ब्रेकिंग आरमोरी शहरातील काही भाग जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

0
565

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी :-
आरमोरी शहर शिक्षणाच्या दृष्टीने तसेच व्यावसायिक दृष्ट्या खूप मोठा तालुका असल्यामुळे आरमोरी शहरामध्ये नेहमीच नागरिकांची वर्दळ असते या शहरातील काही नागरिक बाहेर ठिकाणी रोजगाराच्या शोधात गेले होते. सध्या संपूर्ण भारतामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत दिसत असताना बाहेर गेलेले प्रवासी आरमोरी शहरांमध्ये दाखल झाले .त्यांना कॉर्रटाईन करून त्यांचा स्वाब घेतला असता काही प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहेत.

त्यामुळे आज दिनांक 4/8 /2020 ला सांयकाळी 6.00 वाजता पासून जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशानुसार तहसीलदार आरमोरी यांनी गायकवाड चौक तसेच विठ्ठल मंदिर वॉर्ड या भागात प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्यात आला आहे.