रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी पाणी साठले. रत्नागिरीत आज आणि उद्या ‘रेड अ‍लर्ट’

0
131

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी – मंगळवार व बुधवारी दोन दिवस राज्यातील सात जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘रेड अ‍लर्ट’ दिला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांत ४ व ५ ऑगस्ट रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, तर अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने मान्सूनचा जोर वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात ४ ते ७ ऑगस्ट, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात ४ ते ६ ऑगस्ट, तर विदर्भात ४ व ५ रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गेले काही दिवस आज मंगळवारपासून राज्यात बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
चिपळूण मध्ये नदीकिनारी असणाऱ्या सखल भागात पाणी भरले आहे चिपळूण तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीचे पाणी देखील वाढले आहे. या पाण्याने अद्यापही धोक्याची पातळी गाठली नसली तरी शहरातील नदी किनारी असणाऱ्या सखल भागातून गुडगाभर पाणी साचल्याचे पहावयास मिळत आहे. नगरपालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना इशारा दिला आहे. चिपळूण बाजारपेठत अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. नागरिकांनी आपले सामान अन्यत्र हलवावे असे सांगण्यात आले आहे जेणेकरून नुकसान कमी करता येईल. व कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन वीभागाशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.
रत्नागिरीत चांदेराई बाजारपेठेत दुकानातून पाणी शिरले आहे त्यामुळे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेतील दुकानातून पाणी शिरले आहे. व्यापारी आपला माल इतरत्र हलवत आहेत. येथील नदीचे पाणी आता लवकरच पुलाला टेकण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत सुमारे ३ फुट पाणी असून पाण्याची पातळी वाढत आहे. यामुळे रत्नागिरी देवधे मार्ग पूर्णतः बंद झाला आहे.
खेड मधील जगबुडी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आजूबाजूच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. जिल्हाभरात अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे.

*दखल न्यूज भारत*