महाराष्ट्र धनगर सेनेकडून रक्षाबंधन कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत केला साजरा

142

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

आज गेली पाच महिने झाले कोरोनाचे संकट आहे या संकटात आपल्या जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिस प्रशासन तसेच सरकारी कर्मचारी व डाॕक्टर यांचा सन्मान व्हावा म्हणून महाराष्ट्र धनगर सेना या संघटनेच्या तर्फे सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
संपुर्ण महाराष्ट्रात धनगर सेनेकडून अशाप्रकारे सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहे असे महाराष्ट्र धनगर सेना संस्थापक अध्यक्ष अजित सोनटकले यांनी म्हटले. रक्षाबंधन निमित्त अनेक ठिकाणी राखी बंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम करणारे सरकारी कर्मचारी कोरोना योद्धा यांचा आदर्श ठेवून सन्मान करण्याचा हा प्रयत्न होता. या प्रसंगी महाराष्ट्र धनगर सेना संस्थापक अध्यक्ष अजित सोनकटले, संदिप कांबळे, अतुल लांडगे, निखिल घोडके, आदी उपस्थित होते. धनगर सेनेच्या या उपक्रमांचे अनेकांनी कौतुक केले.

*दखल न्यूज भारत*