धनगर व धनगड चा विचार न करता श्रीकांत खांडेकर मेहनतीने झाले IAS पोरांच्या यशाची बातमी कळली तेव्हा ती शेतात खुरपनी करत होती

286

 

जिल्हा प्रतिनिधी, नांदेड
राजेश बालाजीराव नाईक
दखल न्यूज / दखल न्यूज भारत

दखल विषेश बातमी

विषेश बातमी (नांदेडव्हून) :-

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा २०१९ परिक्षांचा अंतिम निकाल आज ( दि. ४ ) अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांनी बाजी मारली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील श्रीकांत खांडेकर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 231 व्या क्रमांकावर आलेला असून श्रीकांतच्या शिक्षणासाठी वडिलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलांच्या शिक्षणावर खर्च केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अखेर मुलाने कलेक्‍टर होण्याचे ध्येय पूर्ण केले.

तर पंढरपूरमधील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुखने यूपीएससी परीक्षेत १५१ वे स्थान पटकावले असून त्याची आयएएससाठी निवड झाली आहे.तर खर्डी येथील राहुल चव्हाण यांनी यश संपादन केले आहे. राहुल चव्हाण यांना यूपीएससी परीक्षेत 109 वा रँक मिळाला आहे.विशेष म्हणजे या दोन्ही युवकांचे शालेय आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे पंढरपुरातच झाले.

तर, अक्कलकोटचा योगेश कापसे,अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्यातील उपलाई बुद्रुक येथील अश्विनी वाकडे हिने २०० वा रँक मिळवला असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती, तर मुलाखती फेबु्रवारी आणि आॅगस्ट २०२० मध्ये घेण्यात आल्या होत्या. याच परीक्षेत वाघोली (ता.माळशिरस) येथील सागर मिसाळ हाही उत्तीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, देशात प्रदीप सिंह हा पहिला आला असून त्यापाठोपाठ जतिन किशोर, प्रतिभा वर्मा, हिमांशू जैन, जयदेव सी. एस यांनी पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवले आहे.

मराठमोळ्या अभिषेक सराफ हा महाराष्ट्रातून प्रथम आला असून त्याने पहिल्या १० यशस्वी उमेदवारांच्या यादीत आठवे स्थान मिळवले आहे. अभिषेक याच्यासह नेहा भोसले हिने १५ वे तर मंदार पत्की याने २२ वे स्थान मिळवले आहे.

सप्टेंबर,२०१९ घेण्यात आलेली लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, २०२० मध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतींच्या आधारावर आयोगाने गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.निवड झालेल्या उमेदवारांची उपलब्ध जागांनुसार लवकरच नियुक्ती करण्यात येईल. गुणवत्ता यादीनूसार निवड झालेल्या उमेदवारांची आयएएस, आयपीएस, आयएफएस, भारतीय रेल्वे खाते सेवा अंतर्गत रेल्वे गट अ आणि भारतीय टपाल सेवेसह काही इतर सेवांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये जनरल कॅटेगरीमधील ३०४, ईडब्ल्यूएसमधील ७८, ओबीसीमधील २५१, अनुसुचित जातींमधील १२९ तर अनुसुचित जमातींमधील ६७ अशा एकूण ८२९ उमेदवारांचा समावेश आहे. यूपीएससीकडून १८२ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. यातील ९१ उमेदवार जनरल कॅटेगरी, ९ ईडब्ल्यूएस, ७१ ओबीसी, ८ अनुसूचित जाती तसेच ३ अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत

दरम्यान, यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकूण २,३०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परीक्षेचा तिसरा टप्पा म्हणजेच, मुलाखतींची प्रक्रिया १७ फेब्रुवारी २०२० पासून सुरु झाली होती. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे मार्चमध्ये काही मुलाखती स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुलाखती २० ते ३० जुलै दरम्यान घेण्यात आल्या असून यूपीएससीने मुलाखतीत सहभागी झालेल्या सर्व पात्र उमेदवारांना अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या.

परिक्षेतील टॉप १० उमेदवार

१) प्रदीप सिंह
२) जतीन किशोर
३) प्रतिभा वर्मा
४) हिमांशू जैन
५) जयदीप सी एस
६) विशाखा यादव
७) गणेश कुमार भास्कर
८) अभिषेक सराफ
९) रवि जैन
१०) संजिता मोहापात्रा

यूपीएससी यशस्वितांपैकी काही मराठी नावे पुढीलप्रमाणे –

-रँक आणि नाव

●१५ नेहा भोसले
● २२ मंदार पत्की
● ४४ आशुतोष कुलकर्णी
● ६३ योगेश पाटील
● ९१ विशाल नरवडे
● १०९ राहुल चव्हाण
● १३७ नेहा देसाई
● १३५ कुलदीप जंगम
● १४३ जयंत मंकाळे
● १५१ अभयसिंह देशमुख
● २०४ सागर मिसाळ
● २१० माधव गित्ते
● २११ कुणाल चव्हाण
● २१३ सचिन हिरेमठ
● २१४ सुमित महाजन
● २२६ अविनाश शिंदे
● २३० शंकर गिरी
● २३१ श्रीकांत खांडेकर
● २४९ योगेश कापसे
● ४९७ सुब्रमण्य केळकर