रामभक्तांनी उद्या बुधवारी उत्सव साजरा करा श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने आवाहन

0
82

 

वणी: विशाल ठोबंरे

5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास होणार आहे. त्यानिमित्त हा दिवस रामभक्तांनी उत्साहात साजरा करावा, असे आवाहन श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.5 ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी सर्वांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढावी. सकाळी 10 वा. प्रत्येक चौकाचौकात (अंतर ठेवून) श्रीराम प्रतिमेचे पूजन करावे. पूजन करण्यास येणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक असावे. प्रत्येक घरात रामरक्षा स्तोत्र म्हणावे. मोठया आवाजात घरात रामभजन लावावे, तसेच घराच्या छतावर भगवा ध्वज लावावा. संध्याकाळी 7.30 मि. घरावर, छतावर, अंगणात लायटिंग अथना दिवे लावावे. तसेच घरात पुरणपोळी अथवा एखादा गोडधोड करून हा दिवस साजरा करावा असे या आवाहनात म्हटले आहे.
योग्य ती खबरदारी घेऊन उत्सव साजरा करा – रवि बेलूरकर
5 ऑगस्ट हा दिवस सर्व रामभक्त व कारसेवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे परिसरात हा दिवस उत्सवासारखा साजरा करण्यात यावा. सध्या कोरोना महामारीचे दिवस असल्याने प्रत्येकांनी सुरक्षीत अंतर ठेवावे व मास्क लावून व संपूर्ण खबरदारी घेऊनच हा दिवस साजरा करावा.
रवि बेलूरकर, श्री रामनवमी उत्सव समिती

राम मंदिराचे भूमिपूजन बुधवार 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात काही निवडक लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यानिमित्त हे आवाहन करण्यात आले आहे.