कन्हान शहर विकास मंच द्वारे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

56

 

कन्हान (जि प्र):- कन्हान शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संताजी नगर कांन्द्री येथे करण्यात आले असुन मंच च्या पदाधिकार्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .
रविवार दिनांक १ आॅगस्ट २०२१ ला कन्हान शहर विकास मंच द्वारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन संताजी नगर कांन्द्री येथे करण्यात आले असुन अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर मंच नवनिर्वाचित सदस्य महेंन्द्र साबरे यांच्या हस्ते पुष्प हार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यकारी संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर व हरीओम प्रकाश नारायण यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व नागरिकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली .