काद्री येथिल दोन युवकानी जिव घेण्याच्या उद्देशाने युवकाला छातीवर चाकू ने गंभिर जख्मी केले.दोन्ही आरोपीना गुन्हे शाखेने मनसर ला केले अटक.

150

 

पाराशिवनी (जि प्र):-तालुकातिल कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत जुन्या एम.एस.सी.बी जवळ कांन्द्री येथे तक्रारदार व आरोपी हे मित्र असुन यांच्यात काही कारणा वरुन भांडण झाल्याने आरोपी ने तक्रारदार च्या अंगावर चाकुने माराहण करुन गंभीर जख्मी केल्याने तक्रारदार यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
स्थानिय गुन्हेशाखे चे नागपुर ग्रामिण चे सहा पो निं आनिल राऊत,उप निरी शेख,सहा उप श्रि लक्ष्मीप्रसाद दुबे ,पो हवलदार विनोद काळे, नायक पो शि शैलेश यादव,अराविंद भगत, विरेन्द्र नरड,चालक फौजदार साहेबराव बेहाळे,यांनी दोन्ही आरोपी ना मनसर येथुन अटक केले आहै.

मिळाली माहीती नुसार हकीकत अशा प्रकारे आहे की तक्रारदार आकाश धनिराम भोंडेकर वय २५ वर्ष राहणार हरिहर नगर वार्ड नंबर१ कांन्द्री कन्हान हा व आरोपी इरफान उर्फ चोरवा मकबुल खान वय १९ वर्ष राहणार हरिहर नगर वार्ड नंबर १ कांन्द्री हे एकच मित्र असून एकाच वस्तीत राहत असुन शनिवार दिनांक ३१ जुलै २०२१ ला सांयकाऴी तक्रारदार आकाश धनिराम भोंडेकर हा आपले मोटर सायकल . ने घरी जात असता आरोपी इरफान उर्फ चोरवा मकबुल खान
याने आपली सायकल आकाश धनिराम भोंडेकर यांचे मो.सा.समोर आणल्याने त्यावरून आकाश धनिराम भोंडेकर व आरोपी इरफान उर्फ चोरवा मकबुल खान या दोघांमध्ये तोंडा तोंडी वाद झाला . त्या दरम्यान आरोपी इरफान उर्फ चोरवा मुकबुल खान याने आकाश धनिराम भोंडेकर ला दोन तीन झापड मारली व पाहून घेण्याची धमकी दिली त्यावर आकाश धनिराम भोंडेकर याने आरोपी
इरफान उर्फ चोरवा मुकबुल खान याला म्हटले कि तूझ्यासारखे खूप पाहीले ,तेरी औकात नही है असे म्हणून फिर्यादी आकाश धनिराम भोंडेकर घरी निघून गेला दुसऱ्या दिवशी आज रविवार दिनांक १ आगस्ट २०२१ ला सकाळी ९:०० ते ०९:३० वाजता च्या सुमारास
आकाश धनिराम भोंडेकर हा चौकात उभा असता आरोपी इरफान उर्फ चोरवा मुकबुल खान हा तेथे आला व आकाश धनिराम भोंडेकर यास म्हणाला कि तू काल माझी औकात का काढलीस असे बोलून मनात राग धरुन आकाश धनिराम भोंडेकर याचा जिव घेण्याच्या उद्देशाने तक्रारदार आकाश धनिराम भोंडेकर याच्या छातीवर,डाव्या कंबंरेवर ,उजव्या हाताच्या दंडावर चाकूसारख्या शस्राने माराहण करुन जख्मी केले. अशी तक्रारदार गंभिर जख्मी आकाश धनिराम भोंडेकर यांच्या तोंङी रिपोर्ट वरुन व वैद्यकीय रिपोर्ट वरुन आरोपी इरफान उर्फ चोरवा मुकबुल खान यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक २९८ /२०२१ कलम ३०७,५०७ भा द वि गुन्हा नोंद करुन तपासात घेतला असुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे . सदर घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करत आहे