अहेरीत महसूल दिन साजरा

61

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- येथील तहसील कार्यालयात रविवार 1 आगष्ट महसूल दिनी महसूल दिन तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आले.
अध्यक्षीय स्थानावरून तहसीलदार ओंकार ओतारी यांनी, महसूल विभाग हे शासनाचे मध्यवर्ती विभाग म्हणून कार्यरत असून जमीन महसूल वसूल, कायदा व सुव्यवस्था राखणे या मुख्य उद्देशाने सुरू झालेल्या प्रत्येक निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, विविध सामाजिक योजना, जातीचा दाखला, अधिवास दाखला, उत्पन्न दाखला, शेतकरी दाखले आदी आणि शासनाकडून जे कोणतेही मोठे अभियान राबविले जाते त्याची चोख व यशस्वीपणे अंमलबजावणी करणे महसूल विभागावर असते असे म्हणत कोरोनाच्या प्रादूर्भावातही महसूल विभागाचे कर्मचारी अविरतपणे कार्य करीत असल्याचे आवर्जून उल्लेख करून तहसीलदार ओंकार ओतारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, निरीक्षक, अव्वल कारकून, शिपाई, कोतवाल आदी कर्मचारी उपस्थित होते.