माणुसकीचे रक्त ट्रान्स्फर करत एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मैत्रीदिन साजरा करण्यात आला.

99

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : आज दि १ ऑगस्ट २०२१ रोजी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन माजी विद्यार्थी संघटनेने केले होते. चिपळूण मध्ये महापूर आला आणि मोठ्या प्रमाणात हानी झालेली आपण सगळ्यांनी पहिली आहे. अशी संकटे माणसावर येत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे हे एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी ओळखले आणि म्हणूनच अनोख्या पद्धतीने मैत्रीदिन साजरा केला. एकीकडे माणसातील माणुसकी हरवत असताना मैत्रीदिनाच्या निमित्ताने माणसाने माणसाशी ‘माणूसपणाच्या’ माध्यमातून जोडले गेलो पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे नियोजन केले होते. या शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला.
या कोरोनाच्या काळात जास्तीतजास्त विद्यार्थी सहभागी व्हावेत आणि जास्तीतजास्त रक्त पिशव्या जमा करता याव्यात यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्याच बरोबर काहींना त्याच्या घरापर्यंत सुखरूप पोहचविण्याची सुद्धा व्यवस्था करून रक्तदाते म्हणजे माणुसकीचे रक्त ट्रान्स्फर करणारे मित्र आहेत असा संदेश त्यांनी आपल्या सबंध कामातून दिला.
रक्तदानाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील माधुरी ठाकरे (CHO), आश्विन राम (CHO),योगिता सावंत, गौरी सावंत,सचिन फुटक, संदिप वाडेकर, शिने मथेरा तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील गणेश राऊत,योगेश पालेकर, तुषार मांडवकर,अंकिता चौघुले, प्राजक्ता साळवी, सुमित सामंत,मनिष साळवी,निलेश आखाडे, सिद्धेश सावंतदेसाई,प्रशांत घवाळी, प्रथमेश कांबळे इत्यादी माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वामन सावंत सर, प्रा.सुशील साळवी सर,मुकादम सर यांचे अमूल्य सहकार्य लाभले.

*दखल न्यूज भारत*