भाजपाचे विद्यमान नगरसेवक संतोष पारखी यांचा कॉंग्रेस मध्ये जाहिर प्रवेश वणी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदावर नियुक्ति….

79

 

वणी : परशुराम पोटे

नगर पालीकेची निवडणुक जवळ आली असता भाजपाचे विद्यमान नगर सेवक संतोष पारखी यांनी कॉंग्रेस प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात रंगत निर्माण झाली आहे.
आज दि.१ जुलै ला ऊर्जामंत्री श्री नितीन राऊत हे रंगनाथ स्वामी नागरी पत संस्थेच्या ग्रामीण शाखेच्या उद्घाटनप्रसंगी वणीत आले असता माजी आमदार वामनराव कासावार यांचे येथिल कार्यालयात भेट देऊन कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली. प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यानंतर विविध पक्षाचे कायकर्ते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजपाचे विद्यमान नगरसेवक संतोष पारखी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ज़ाहिर प्रवेश केला. यावेळी कॉंग्रेस पक्षाने त्यांची नियुक्ती वणी विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदावर केली.
यावेळी खा.बाळु धानोरकर,वामनराव कासावार,एड.देवीदास काळे,टिकाराम कोंगरे,ईजहार शेख, ओम ठाकुर , अशोक चिंडालिया, आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर तालुकाध्यक्ष , वंदना आवारी , प्रमोद निकुरे, संध्या बोबडे,वंदना धगड़ी,मंगला झिलपे ,पुरूषोत्तम आवारी, डॉ.मोरेश्वर पावड़े,राजू येल्टीवार, प्रकाश कासावार, सुरेश काकड़े, रवि देठे इतर पदाधिकारी उपस्थित होते.