वेगळा विदर्भ राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही :- ऍड वामनराव चटप माजी आमदार 09 ऑगस्ट 2021 ला नागपूर येथे “वेगळा विदर्भ” मागणीच्या आंदोलनाची पूर्वतयारी विदर्भ राज्य आंदोलन समिती नेरी, चिमूर यांचे माध्यमातुन जनता विद्यालय नेरी येथे बैठक संपन्न

97

 

प्रमोद राऊत दखल न्यूज भारत

कांग्रेस आणि भाजपा ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत विदर्भातील जनतेला यांनी भूलथापा देऊन मताच्या राजकारणासाठी आपली पोळी शेकून घेतली आणि विदर्भ राज्य देतो म्हूनन जनतेला तोंडाला पाने पुसली 2014 मध्ये विदर्भाच्या मुद्यावर भाजपने निवडणूक लढविली परंतु सत्ता येताच शिवसेना च्या दबावात विदर्भाचा मुद्दा विसरले पण आता मी वेगळा विदर्भ राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन ऍड वामनराव चटप माजी आमदार तथा विदर्भ आंदोलनाचे नेते यांनी नेरी येथील विदर्भ राज्य आंदोलन समिती नेरी च्या वतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले.
नेरी येथील विष्णुकांत बिरेवार सभागृहात विदर्भ राज्य आंदोलन समिती नेरीच्या वतीने काल 31 जुलै ला दुपारी 2 वाजता वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलोनात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे अनेक नेत्यानी कार्यकर्त्यांनी हजेरी लावून आपला पाठिंबा जाहीर केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऍड वामनराव चटप माजी आमदार शेतकरी संघटनेचे नेते, डॉ. रमेश कुमार गजभे माजी आमदार विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते डॉ हेमंत ईसनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रा. पिटाळे, मोरेश्वर झाडे किशोर दहेकर, मधुकरराव चिंचोळकर नगरसेवक, प्रशांतभाऊ डवले, युवा आघाडी अध्यक्ष चिमूर, राजुभाऊ गजानन अगळे, अंकुशभाऊ, वाघमारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात बोलताना डॉ गजभे म्हणाले की अनेक वर्षांपासून विदर्भावर अन्याय झाला आहे तो संपविण्यासाठी वेगळ्या विदर्भ राज्याशिवाय पर्याय नाही तर अनेक मान्यवरांनी विदर्भाच्या समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न रोजगार वीज सिंचन अश्या अनेक मुद्यावर मार्गदर्शन केले विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न संपाविण्यासाठी व बेरोजगाराच्या रोजगारासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याचा नारा दिला तसेच नागपूर येथे 9 आगस्ट 2021 रोजी वीज व स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भस्तरीय बेमुदत ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक टी एल पिसे यांनी केले या कार्यक्रमाचे संयोजन रामकृष्ण लाभे टीकाराम पिसे, केवळराम वाघे, काशीनाथ चांदेकर, व सर्व विदर्भ राज्य आंदोलन समिती नेरी यांनी केलें.