आम्ही भारतीय परिवार तर्फे शिलादेवी परिसरात सीडबॉल रोपण तालुक्यातिल शिलादेवी गावात जागतिक व्याघ्र दिनानिमित्त परिसरात सीडबॉल रोपण करून’वाघ वाचवा, जंगल वाचव’ चा संदेश देण्यात आला.

26

 

पारशिवनी (जि प्र):-
राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय नवेगाव खैरी द्वारा संचालित पेंच निसर्ग मित्र मंडळ व आम्ही भारतीय अभियान यांचे द्वारा ३१ जुलैला जागतिक व्याघ्र दिनानिमित्त शिलादेवी परिसरात सीडबॉल रोपण करून ‘वाघ वाचवा, जंगल वाचवा’ चा कृतिशील संदेश देण्यात आला. यावेळी कडुनिंब, चिंच, घोगल, आकोल, गरुड वृक्ष/मोखा, गुलमोहोर, अमलतास/बहावा, सिंधी, करंज, बेल, पळस, रोहण, कदम, कशिया, ड्युरांडा, बेहडा, चारोळी, रिठा, अर्जुन, सेमल, लेंडिया व आंबा अशा देशी झाडांच्या बियांपासून १५३१ सीडबॉलचे रोपण करण्यात आले.
याप्रसंगी निसर्ग मित्र मंडळाचे संयोजक व शिक्षक साक्षोधन कडबे, वनरक्षक सुनील वाघमारे, पांडुरंग चोपडे यांनी निसर्गदुतांद्वारा निरंतर सुरू असलेल्या पर्यावरण विषयक संरक्षणात्मक कार्याचे कौतुक केले. निसर्गदूत नीरज राऊत व शिलादेवीतील सुरेंद्र उईके, प्रवीण उईके, दिलीप नागवंशी, अशोक लामसे, गणेश तुमडाम, अजित बेलवंशी, दिपक धुर्वे, प्रणय आरसे, विक्रम, आदित्य बेलवंशी, सुमित तुमडाम, सुशील तुमडाम, अरूण नेकाम, दिपिका धुर्वे, प्रिया आरसे, आकांक्षा भोरसे, आशिका भोरसे, नंदिनी आरसे, अजय बेलवंशी, विजय बेलवंशी, रंजना टेकाम, अंकुश उईके, कार्तिक, संतोषी धुर्वे, सावित्री आरसे, पुष्पा धुर्वे व गावातील बहुसंख्य नागरिकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.