ब्रेकिंग न्युज आरमोरी तालुक्यातील सुकाळा येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळला आज पासून सुकाळा गाव प्रतिबंधित क्षेत्र लागू परिसरात भीतीचे वातावरण

574

 

हर्ष साखरे तालुका प्रतिनिधीआरमोरी 9518913059

सुकाळा:-

प्राप्त माहितीनुसार मौजा सुकाळा येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या नवनवीन रुग्णांमध्ये आणखी भर पडत आहेत त्यातच आज झालेल्या माहितीनुसार सदर रुग्ण हैदराबाद येथे कंपनी मध्ये काम करत होता तो काही दिवसांपूर्वी आरमोरी विलीनीकरण सेंटर मध्ये होता.

त्याची पहिली रिपोर्ट निगेटिव्ह आलेली होती परंतु दुसरा रिपोर्टमध्ये तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशाने तहसीलदार आरमोरी यांनी आज दि. 4/08/2020 ला सायंकाळी 6.00 वाजता पासून सुकाळा गाव 14 दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तींना सुकाळा या गावात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे .सदर रुग्ण सोबत इतर सहकारी यांनासुद्धा कोरोना निघाला होता त्यामुळे त्यांच्या संपर्कात आल्याने सुकाळा येथील व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर प्रतिबंधित क्षेत्र पूर्वेस इंदिरा आश्रम शाळा, पश्चिमस नीलकंठ राऊत, उत्तरेस मोहझरी रोड, व दक्षिनेस मेंढेबोडी रोड या भागात जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी लागू केला आहे.