आशा, गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या वाढीव मानधनाची तातडीने पूर्णतः करावी…… अहेरी येथील मेळाव्यात आयटक ची मागणी…..

99

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

अहेरी:–राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण व शहरी भागात, आरोग्य विभागाचा कणा म्हणून तुटपुंज्या मोबदल्यात काम करणाऱ्या आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांना एप्रिल महिन्या पासून वाढीव दोन व तीन हजार रुपये मानधन दिले नाही. याउलट नुकताच कृती समितीच्या नेतृत्वात राज्यभर आशा व गट प्रवर्तक महिलांनी 15 जून पासून कोरोणा प्रोत्साहन भत्ता प्रतिदिन 300 रू. देण्यात यावे व त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी यासाठी राज्यव्यापी संप पुकारला होता. याची नोंद घेऊन सरकारने 23 जून रोजी आशा वर्कर ला हजार रुपये तर गट प्रवर्तक यांना मासिक बारासे रुपये व प्रोत्साहन भत्ता मासिक 500 रू. देण्याची घोषणा केली. परंतु आता पर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून अहेरी येथील मेळाव्यात आय टक चे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे यांनी मानधन वाढ निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

अहेरी येथील पंचायत समिती सभागृहात 31 ऑगस्ट 2021 रोजी कॉ.विद्या येजुलवार यांच्या अध्यक्षतेखाली आयटक च्या नेतृत्वात आशा व गट प्रवर्तक महिलांचा तालुका मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ.विनोद झोडगे तर व्यासपिठावर तालुका अधक्ष वैशाली सोनटक्के, रुक्साना शेख, सुमन वेलादी आदी मान्यवर उपस्थित होत्या.

सदर मेळाव्यात आशा व गट प्रवर्तक यांच्या स्थानिक अनेक प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये करोना काळात काम करताना आशा व गट प्रवर्तक यांना मासिक 1000 रू.देण्याचा ग्राम विकास खात्याचा निर्णय आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. एप्रिल पासूनचा वाढीव थकीत मानधन व ईतर मोबदला त्वरित द्यावा. तसेच मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर 2020 पर्यंत एच्.बी. वाय.सी.चे काम करणाऱ्या आशा वर्कर ला पैसे देण्यात आले नाही ते त्वरित द्यावे. रक्त नमुण्यामध्ये किंवा आर डी के मध्ये पी.वी.पी. एफ. निघाल्यास त्या रुग्णांचे घरचे दिवसातून 4 वेळा रक्त नमुने घेण्यास आशा वर्कर ला सांगतात परंतु मोबदला दिल्या जात नाहीत ते त्वरित द्या. पेरमिली प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत 2020 मध्ये हत्ती रोग सर्वे करूनही पैसे मिळाले नाही, ते देण्यात यावे. मास्क सर्वे मध्ये गावातील प्रत्येक लोकांचे रक्त नमुने एप्रिल व मे 2021 मध्ये घेण्यात आले परंतु पेरमिली phc मधील आशा वर्कर चे पैसे देण्यात आले नाही ते त्वरित देण्यात यावे. जे.एस. वाय.चे पैसे 600 रू.प्रमाणे देण्याचे पत्र असतानाही अहेरी तालुक्यातील आशा वर्कर ला फक्त 300 रू.प्रमाणे मोबदला देण्यात येतो. व जो पर्यंत मातेला लाभ मिळत नाही तो पर्यंत उर्वरित रक्कम आशा ला देत नाही तेव्हा ही अट रद्द करण्यात यावी. IHBNC अंतर्गत अहेरी तालुक्यातील आशा वर्कर 8 ते 10 भेटी घेत असतानाही त्यांच्या फक्त 4 भेटी दाखवतात हा प्रकार त्वरित थांबवून त्यांना न्याय देण्यात यावे यासह अनेक समस्यांवर चर्चा करून मा तालुका आरोग्य अधिकारी व तालुका समूह संघटक यांना अवगत करून तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी मोदी सरकार च्या कामगार व किसान विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी आंदोलन च्या अनुसंघाने तहसील कार्यालय समोर तीव्र निदर्शने करण्या चा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मेळाव्यात तालुक्यातील सर्व आशा वर्कर व गट प्रवर्तक महिला उपस्थित होत्या.