मदत नव्हे कर्तव्य !

53

प्रतिनिधी :बाळू राऊत
मुंबई, दि. १ : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत कोकणातील पूरग्रस्त भागातील जनतेसाठी अन्नधान्य व गृहउपयोगी साहित्य चिपळूणसाठी रवाना करण्यात आले. कोकणात पूरग्रस्त बांधवांना आधार देण्यासाठी सुमारे १० ट्रक साहित्य घेऊन निघालेल्या वाहनांना सामना कार्यालय प्रभादेवी येथून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भगवा झेंडा दाखवून रवाना केले याप्रसंगी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, धुळे नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.