राम मंदिर निर्मिती शुभारंभाचा आनंद रत्नागिरी भा.ज.पा. उत्साहाने साजरा करणार, रामरक्षा पठण प्रतिमापूजन याचे नियोजन.

120

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

रत्नागिरी :- राम जन्मभूमि अयोध्या येथे राम मंदिर उभारणीच्या कामाचा शुभारंभ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. भा.ज.पा.चे उद्दिष्ट प्रभू रामचंद्रांचे मंदिर अयोध्येत उभे करण्याचे होते. अनेक वर्षे यासाठी लढा चालू होता. प्रभू रामचंद्रांचे मंदिर साकारण्यास सुरुवात होणे ही अवर्णनीय आनंदाची गोष्ट आहे. हा अवर्णनीय सोहळा साकारताना सर्व भारत वर्षाला आनंद होत आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी रत्नागिरी भा.ज.पा.ने नियोजन केले असून भा.ज.पा. कार्यालयावर रोषणाई करण्यात आली आहे. तसेच उद्या ११.०० वाजता भा.ज.पा. कार्यालयात सोशल डिस्टन्ससिंग पाळून गर्दी न करता रामरक्षा पठण होईल. तसेच टाळ वाजवून गजर केला जाईल. शहरांमध्ये पंधरा ठिकाणी राम प्रतिमेचे पूजन असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण दक्षिण जिल्ह्यात यानुसार आनंदोत्सव साजरा केला जाईल. कार्यकर्ते आपल्या घरांवर भगवे ध्वज उभारतील, दिवे लावण्यात येतील, शक्य तिथे रांगोळ्या घातल्या जातील. प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाचे भान राखत आनंदोत्सव साजरा होईल अशी माहिती अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

*दखल न्यूज भारत*