परभणी जिल्हाभरातील युरिया खताची कृत्रिम टंचाई दूर करा- सखाराम बोबडे पडेगावकर

21

 

प्रतिनिधी- परभणी जिल्हाभरात खत विक्रेते आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मिलीभगत मुळे झालेली युरिया खताची कृत्रिम टंचाई दूर करण्याची मागणी जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय परभणी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले .परभणी जिल्ह्यात कोणत्याही दुकानावर युरिया खताची मागणी केली असता दुकानदार खत नाही असे सांगतात. किंवा युरीया खत पाहिजे असेल तर दुसरा एखादा खत द्यावा लागेल अशी अट घातली जात आहे. काही शेतकऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर मात्र या शेतकऱ्यांना एक-दोन खताचे पोते मिळत आहेत. तरी जिल्हाभरातील खत विक्रेते आणि संबंधित अधिकारी यांच्या संगनमताने चालू असलेली जिल्हाभरातील खताची टंचाई दूर करावी अशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, संपर्कप्रमुख रविकांत हारकळ यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.