राजापूर-लांजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांच्या सूचनेनुसार लांजा तालुक्यातील पूर्व भागात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी स्कॅनींग सेंटरची सुरुवात..

131

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील पूर्व भागातील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी तहसीलदार लांजा यांच्याकडे केलेल्या सूचनेप्रमाणे गणेशोत्सव काळात मुंबई मधून चाकरमानी गणेशोत्सवा साठी आपआपल्या गावी मोठ्या संख्येने येतात त्यामुळे कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या चाकरमान्यांची स्कॅनींग टेस्ट केल्याशिवाय कोणालाही तालुक्यामध्ये प्रवेश दिला जाणार नसल्यामुळे चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून लांजा तालुक्यातील पूर्व भागामध्ये बोरीवले तिठा येथील मंथन हॉटेल येथे आज पासून स्कॅनींग सेंटर ची सुरुवात करण्यात आले. त्यामुळे मुंबई व इतर ठिकाणाहून येणाऱ्या चाकरमान्यांना स्कॅनींग करून त्यांच्या वेळेची बचत होऊन आपआपल्या गावी जाणे सोईस्कर होणार आहे. त्याप्रसंगी तहसीलदार लांजा केळुस्कर, लांजा पोलीस निरीक्षक चौधर, उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग माने, तालुकाप्रमुख संदीप दळवी, सभापती लीला घडशी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मंचेकर, विभागप्रमुख शरद चरकरी, उप सभापती दीपाली दळवी-साळवी, उप विभागप्रमुख चेतन खंदारे, शिपोशी सरपंच जाधव, राजू शिंदे व मान्यवर उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*