पळसगाव परीसर तिनं दिवसांपासून अंधारात विजपुरवठा सुरळीत न झाल्यास गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात नागरीकांचा विजवितरण कम्पनी आरमोरी समोर आंदोलनाचा इशारा.

128

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

आरमोरी तालुक्यातील पळसगाव परीसरात गेल्या तिनं दिवसांपासून विज पुरवठा बंद असल्यामुळे संपुर्ण परीसरातील गावे अंधारात असल्याने सामान्य नागरीक पावसाच्या दिवसात त्रस्त होऊन वैतागलेला असुन विज वितरण कम्पनीच्या विरोधात तिव्र संताप व्यक्त करीत आहेत, तात्काळ परीसरातील विज सुरळीत करा अन्यथा विज वितरण कंपनी आरमोरी च्या समोर गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात नागरीकानी तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आरमोरी तालुक्यातील पळसगाव, जोगीसाखरा, पाथरगोटा, शंकरनगर, सालमारा, कनेरी व रामपूर परीसरातील गावांचा विज पुरवठा कोणतेही कारण नसताना तिनं दिवसांपासून बंद असल्यामुळे संपुर्ण गावे अंधारात असल्याने पावसाच्या दिवसात रात्रोच्या वेळी साप, विंचूसह डासांचा प्रादुर्भाव लहान मुलांसह नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कृषी पंपाचे रोवणे विज पुरवठा बंद असल्यामुळे खोळबले आहे. तसेच उष्माघात वाढण्याची दाट शक्यता असल्याने नागरीक विजेच्या समस्याने वैतागले असल्याने परीसरातील तिनं दिवसांपासून बंद असलेला विज पुरवठा सुरळीत करा.अन्यथा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात नागरीकांनी उपविभागीय अभियंता विज वितरण कंपनी आरमोरी समोर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात बाबुराव मने, प्रकाश सेलोकर‌, राजेंद्र बांडे,
सजय सेलोकर, महादेव खोब्रागडे, ‌काथिक भोयर, किशोर झलके, शामराव कामतकर, निखिल तिजारे‌, अतुल सपाटे, मच्छिद्र मेत्राम, पराग सेलोकर, राजु सेलोकर, लालाजी गोधोळे यासह परिसरातील नागरीकानी केली आहे.