प्रसार माध्यमांना बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळे…’; राज कुंद्रा प्रकरणी न्यायालयानं शिल्पाला सुनावलं

85

 

हर्ष साखरे उपसंपादक

मुंबई : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील व्हिडीओ प्रकरणी अटक झाल्यामुळे राजसोबतच शिल्पाला देखील सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. या प्रकरणानंतर माध्यमांनी शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात अनेक बातम्या दिल्या. त्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं माध्यमांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

या सुनावणीत ‘कोणत्या एका माध्यामानं दाखवलेल्या बातमीचा आधार घेत तुम्ही सगळ्याच माध्यमांवर बंधने आणण्याची मागणी करत आहात, हे धक्कादायक आहे असा सरसकट निर्देश देता येत नाही. आपला लोकशाही देश आहे इथे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रसार माध्यमांना देखील पूर्ण स्वातंत्र्य आहे’, असं न्यायनूर्ती गौतम पटेल यांनी म्हटलं.

‘पत्रकारीता ही विश्वासहार्य आणि जबाबदारीनं केली पाहिजे हे ही तितकंच खरं आहे त्यामुळे न्यायालय असे निर्देश देऊ शकत नाही’ असं सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, शिल्पा शेट्टीनं 26 ऑगस्टपर्यंत प्रत्युत्तर दाखल करावं, असे निर्देश न्या. गौतम पटेल यांनी दिले आहेत. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 20 सप्टेंबरला होणार आहे