Home चंद्रपूर  नवोदय मेरीटवीर प्रणय शेरकुरे ला बामसेफ तर्फे वर्षभरासाठी दैनिक अंकाची भेट

नवोदय मेरीटवीर प्रणय शेरकुरे ला बामसेफ तर्फे वर्षभरासाठी दैनिक अंकाची भेट

234

 

तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी
8275553131

 

सिंदेवाही – बामसेफ ,बहुजन विध्यार्थी संघटना व जिल्हा परिषद शाळा टेकरि तालुका सिंदेवाहीच्या वतीने नवोदय परिक्षेत तालुक्यात सर्वप्रथम मेरीट आलेल्या जिल्हा परिषद शाळा टेकरि (वानेरि )येथील पाचवी चा विध्यार्थी प्रणय चंद्रशेखर शेरकुरे याचा वर्षभरासाठि विविध दैनिक अंक भेट देऊन नुकताच सत्कार करन्यात आला .

याप्रसंगी बामसेफचे तालुका सह -संयोजक शैलेंद्र खण्डाले ,मुख्याध्यापक प्रभु डांगे ,मार्गदर्शक शिक्षक सुनील घरत,ईश्वर चहान्दे ,डी .बि .शेंडे व शिक्षिका बियाणी उपस्थित होते .

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता बामसेफचे तालुका संयोजक शीलपाल ताम्बागडे ,मिडिया प्रभारी प्रा .भारत मेश्राम व सल्लागार क्रुषि संशोधक डा .विनोद नागदेवते व बहुजन विध्यार्थी संघटना सिंदेवाहीचे तालुका अध्यक्ष इंजि.सचिन शेंडे यांचे सक्रिय योगदान सहित व्रुत्तपत्र वितरक विलास धुळेवार सिंदेवाही ,खूशाब लान्जेवार टेकरि व सुरेश आत्राम वासेरा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे

Previous articleवाजंत्री (डपरे) वादय वाजवणाऱ्याची उपासमारी थांबवा – संदीप कोरेत भाजप जिल्हा सचिव जिल्हाधिकारी याच्याकडे मागणी…
Next articleपळसगाव परीसर तिनं दिवसांपासून अंधारात विजपुरवठा सुरळीत न झाल्यास गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात नागरीकांचा विजवितरण कम्पनी आरमोरी समोर आंदोलनाचा इशारा.