सांगळूदकरवासीयांचा सांडपाण्याच्या डबक्यात उदरनिर्वाह

25

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर शहरातील
सांगळूदकर नगर परिसरात सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने संपूर्ण नाल्याचे पाणी हे लोकांच्या घरांमध्ये जात आहे सदर परिसरामध्ये सर्व उच्चशिक्षित नोकरदार वर्ग असून भीतीपोटी दबत असल्याचे दिसत आहे शहरातील सर्वात जास्त नोकरदार वर्ग ह्याच परिसरामध्ये असून या नगरा वरती अवकृपा कोणाची असा संतप्त सवाल शहरवासी करत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरामध्ये लोकांनी घरे बांधल्यापासून प्राथमिक सोयी सुविधा देण्यामध्ये नगर पालिका प्रशासन सक्षम फेल ठरत आहे परिसरातील नागरिकांनी वारंवार नगरपरिषद प्रशासनाला विनंती फोन द्वारे सूचना व निवेदने देऊन कुठल्याच प्रकारचा उपयोग झाला नसल्याचे दिसून येत नाही ह्या परिसरामध्ये सुमारे पन्नास घरे असून पन्नास कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे सांडपाणी घरातील वापराचे व शौचालयाचे पाणी प्रत्येकाच्या घरात जात असल्याचे दिसत आहे त्या पाण्यामध्ये डासाची उत्पत्ती तसेच सापांचा सुद्धा संचार मोठ्या प्रमाणात होत आहे लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले असून हा या परिसरातील लोकांवर एक प्रकारचा अन्याय होत असून याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल व्यक्त होत आहे राजकीय डावपेचामध्ये ही नाली प्रक्रिया अडकली असल्याचे दिसत आहे तसेच या परिसरामध्ये सर्व उच्चपदस्थ व्यक्ती असल्यामुळे पुढे येण्यास राजी होत नसल्याने याचा गैरफायदा शहरातील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती घेत आहे का या चर्चेला सुद्धा उधाण आले आहे ह्या परिसरातील व्यक्तींचा नगर पालिका प्रशासन व आरोग्य विभाग अंत पाहत असून येथील नागरिकांची प्रचंड पालिका प्रशासनावरती नाराजी व्यक्त होत आहे.