वाजंत्री (डपरे) वादय वाजवणाऱ्याची उपासमारी थांबवा – संदीप कोरेत भाजप जिल्हा सचिव जिल्हाधिकारी याच्याकडे मागणी…

126

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम : कोविड 19 कोरोना महामारी संसर्गजन्य बिमारी मुळे वाजंत्री वादय वाजवणाऱ्यांचे कम्बरडे मोडले गेले आहे त्यांचा अन्नाचा घास हिरावून गेला आहे त्यांची उपासमारी थांबवण्यासाठी त्यांना वाजंत्री वादय वाजवण्याची परवानगी द्या
कोविड 19 च्या संसर्गजन्य विषाणूमुळे पूर्ण देशात लाकडाऊन चि परिस्थिती ओढावली होती त्यामुळे सगळीकडे बंद ची स्थिती निर्माण झाली होती राजकीय, धार्मिक, लग्न सोहळे व सणासुदीच्या कार्यक्रमावर बंदी आणल्या मुळे व याच कार्यक्रमाच्या भरवशावर वाजंत्री वर्गाचा पोट भरत असल्यामुळे वाजत्री वादय वाजवणाऱ्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता.
दुःखाचे असो की सुखाचे राजकिय कार्यक्रम असो की धार्मिक कार्यक्रम त्यांच्या शिवाय पर्याय नाही पन कोविड 19 संसर्जन्य महामारी मुळे प्रशासनाने जे कठोर निर्बध लावण्यात आले त्याच्यामुळे त्यांच्या समोर जगायचे कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे ते रस्त्यावर आले आहे त्याचे संसार उगड्यावर आले आहे.
धिरे धिरे का नसो पण लाक डाऊन मध्ये शिथिलता आली व काही कार्यक्रमाला प्रशासन अटी व शर्ती टाकून परवानगी देत आहे उदा.(लग्न, गणेशोउत्सव ,शारदाउत्सव, दुर्गाउत्सव ,मोहरम) या सगळ्या कार्यक्रमात वाजंत्री वादय वाजवणाऱ्यांची नितांत आवश्यकता असते सगळ्या सोबत यांना पण नियम व शर्ती व अटी टाकून परवानगी द्यावी नाहीतर लकडाऊन संपेपर्यंत सगळ्या वादय वाजवणाऱ्या वाजंत्रीवर्गाला मासिक वेतन द्या अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव ना. संदीप कोरेत यांनी अहेरीचे तहसीलदार श्री ओंकार ओंतारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदनातून केली आहे.