भाजप किसान मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष अतुल गोळे यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना निवेदन

सुयोग टोबरे / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती
दर्यापूर :- मूग व उडीद या पिकावर आलेल्या व्हायरसमुळे दर्यापूर अंजनगाव तालुक्यातील सर्वत्र पीक मोडावे लागत आहे अशा परिस्थितीत त्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार मदत देण्यात यावी ही मागणी भारतीय जनता किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल गोळे यांच्या नेतृत्वात निवेदन उपविभागीय अधिकारी दर्यापूर यांना देण्यात आले दर्यापूर अंजनगाव तालुक्यामध्ये मूग व उडीद चा मोठा फेरा आहे त्यात यादी मुगाची पेरणी दुबार तिबार शेतकऱ्यांना करावी लागली त्यात उभा तोंडाशी आलेले पीक रोगामुळे पूर्ण संपुष्टात आले अशा परिस्थितीत सर्व शेतकरी हवालदिल झालेले आहेत 50 टक्केच्या वर पीक मोडण्यात आली एकीकडे कोरोना संकट डोक्यावरती असताना हे संकट शेतकऱ्यांना सांभाळणे शक्य नसून सर्व बाधित शेतकऱ्यांना विमा असो किंवा नसो त्यांना सरसकट मदत सरकारने द्यावी अशी मागणी करण्यात आली ही मागणी करतेवेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुधीर वानखडे, सोपान कुटेमाटे, अनिकेत शेगोकार, बंडू शर्मा, रोशन गावडे, निखीलेश ठाकूर, अनिल पतींगे, अक्षय धांडे, फारुख भाई, आशिष धानोरकर, रितेश लांडे, विनोद उमाळे, सुनील मोकलकर, गोपाल रोडे, दीपक काटोले, संदीप वडतकर, गोपाल चौधरी, किशोर पदमने प्रामुख्याने उपस्थित होते