वसा जनसेवेचा एक हात मदतीचा जेष्ठ शिवसैनिक भास्करशेठ गाडगे यांनी पूरग्रस्तांसाठी दिला मदतीचा हात

61

प्रतिनिधी : बाळू राऊत
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र व कोकण मध्ये झालेल्या अतिवृष्टीचा सांगली सातारा आणि कोल्हापूर तसेच कोकणातील जिल्ह्यांना देखील मोठा फटका बसला त्यामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले या असमानी संकटामुळे आज त्यांना गरज आहे ती मदतीची त्यामुळे अनेक दानशूर मदतीचे हात पुढे येत आहेत त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा गावचे सुपुत्र ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर शेठ गाडगे यांनी वसा जनसेवेचा एक हात मदतीचा म्हणून महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १,२५,००० चा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला त्यांच्यासमवेत पत्नी संगीताताई भास्कर गाडगे (संचालिका विशाल जुन्नर पतसंस्था) आणि शिवसेना जुन्नर विधानसभा संपर्कप्रमुख शिवसेना प्रणित महाराष्ट्र वितरक सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य दिलीपदादा बाम्हणे उपस्थित होते.