अबब!एक वाजता पासून लैंगिक अत्याचाराची तक्रार घेईनात? – चिमूर पोलिस स्टेशनचा अजब अमानवीय प्रकार! — तो राजकीय व्यक्ती एवढा पाॅवरफुल आहे काय? — २ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण..

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुकातंर्गत मौजा टेकेपार येथे एका २ वर्षाच्या चुमुकल्यावर आज १२ ते १ वाजताच्या दरम्यान लैंगिक अत्याचार २७ वर्षीय नराधमाने केला.या अत्याचार सबंधात मुलाचे आईवडील,मुलाला घेवुन पोलिस स्टेशन चिमूरला दुपारी १ वाजता आले.परंतू चिमूर पोलिस स्टेशन अंतर्गत,लैंगिक अत्याचाराची अजूनपर्यंत तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची दु:खदायक व तितकिच खेदजनक घटना समोर आली आहे.
बलत्कार करणारा मुलाच्या आईचे राजकीय संबंध,एका दमदार राजकीय व्यक्ती सोबत असून,”तो,व्यक्ती तक्रार न नोंदविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप,अत्याचारग्रस्त मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे.
मात्र,हा आरोप,”जर,असत्य आहे असे म्हणावे,”तर, दुपारी १ वाजता पासून अत्याचारग्रस्त मुलाच्या आई-वडिलांना पोलिस स्टेशन चिमूर मध्ये तक्रार न घेता का म्हणून बसवून ठेवले?,यांचे उत्तर पोलिस स्टेशन डायरी अमलदारांना द्यावेच लागेल.
लैंगिक अत्याचारग्रस्तासारख्या गंभीर प्रकरणाची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी एवढा विलंब लागतो काय?हा मुद्दा सुध्दा तितकाच संतापजनक आहे.
२ वर्षीय बालकांवरील लैंगिक अत्याचाराची तक्रार नोंदवून न घेणारा चिमूर पोलिसांचा प्रकार हा अमानवीय दृष्टीकोणातील नाही काय?हा प्रश्न अख्या चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला पडला आहे.