वणी वाहतुक विभागाच्या दोन अधिकार्यांवर कारवाई करुन जिल्ह्याबाहेर बदली करा- शिवसेनेची एसपींकडे मागणी

485

 

वणी : परशुराम पोटे

वणी वाहतुक विभागाच्या दोन अधिकार्यांवर कारवाई करुन त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी, अशी मागणी वणी शहर शिवसेनेच्या वतीने येथिल उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्फत पोलीस अधिक्षक यवतमाळ यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि.२ आँगष्ट ला दुपारी २ वाजता वाहतुक विभागाच्या पोलीस कर्मचार्यांनी मुलाची गाडी पकडली व त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले.परंतु दुचाकिवर ‘जय महाराष्ट्’ का लिहीले?असे म्हणुन वाहतुक पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत ‘तुझ्या बापाला जावुन सांग’ म्हणत गाडी शिपाई रवि सलामे यांनी मुलाच्या हातातुन चाबी हिसकावुन गाडी ठाण्यात घेवुन गेले. मि गाडी सोडविण्यासाठी ठाण्यात गेलो व ४०० रुपये चालान भरली.त्यानंतर त्या पोलीस कर्मचार्यांना तुम्ही उद्धटपने का बोलले अशी विचारणा केली असता आमचे सोबत एखाद्या गुन्हेगारांसारखे जोरजोराने बोलायला लागले.यावेळी उपनिरीक्षक प्रफुल डाहुले हे.शासन भुमिकेत नसुन व्यक्तीगत तिरस्कार व आवेशात बोलत होते.व मि तुला पाहुन घेतो व कुठेतरी फसवतो असे जोरजोरात म्हणुन उपस्थित पोलीस कर्मचार्यांना ‘याला घ्यारे’ कँमेरा चालु करा’ असे म्हणुन सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे मोबाईल हिसकाउन घेतले.यापुर्वीसुद्धा प्रफुल डाहुले यांनी खुप अतिरेक केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.हि घटना सत्य व वास्तवीक असुन यात कुठलाही बनावट शब्दप्रयोग नाही.त्यामुळे प्रशासनाच्या आड गुंडगीरी करणारे वापोउनि/प्रफुल डाहुले व शिपाई रवी सलामे यांच्याविरुद्ध कडक कारवाई करुन त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी,अशा आशयाचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्फत जिल्हा पोलीस अधिक्षक यवतमाळ यांना राजु तुराणकर शिवसेना शहर प्रमुख वणी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास,मंगल भोंगळे,अजिंक्य शेन्डे,बाळु तुराणकर,सचिन पचारे,ललीत लांजेवार,विजय मेश्राम,मुन्ना बोथरा,विशाल किन्हेकर ईत्यादी उपस्थित होते.