पाराशिवनी शहरात आज पुन्हा ११रूग्ण कोरोणा बाधित आढळुन मोठा ब्लास्ट

0
96

 

कमल सिंह यादव
पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत, नागपुर

पारशिवनी :-(ता प्र) पारशिवनी शहरात कोरोना संक्रमित रुग्ण संख्या १६झाली असून मात्र पुन्हा आज ४ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ रुग्ण मिळाल्याने शहरात करोना रुग्णांचा मोठा ब्लास्ट झालेला आहे.
काल दिनांक ३ ऑगस्ट सोमवारी प्रसिद्ध हॉटेल बंधू सह १ गाडी चालक कोरोना संक्रमित मिळाल्याने त्यांच्या संपर्कातील पुन्हा आज ४ ऑगस्ट रोजी ८६लोकाची स्वँब टेस्ट कर०यात आली त्यात आज ११ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याचे आढळले. रक्षाबंधनाच्या दिवशी हॉटेल मधून शेकडो लोकांनी मिठाई सह खाद्य पदार्थ मोठ्या प्रमाणात घरी नेले होते. हॉटेलमधील गर्दी पाहता हजारोच्या संख्येने ग्राहकांची वर्दळ होती हॉटेल मालकासह त्यांच्या संपर्कातील ११ लोके संक्रमित झाल्याने आता शहरात ग्रामीण भागात संख्येने करोना संक्रमणांचे संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.हे आरोग्य यंत्रणेने करिता कोरोना वर मात करणे ही एक अग्निपरीक्षा ठरणार आहे.आता तालुका वैद्यकिय अधिकारी डॉः प्रशांत वाघ, व तहासिलदार वरूण कुमार सहारे ,व मुख्य आधेकारी भगत यांनी नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की हॉटेल व्यवसायिकांच्या संपर्कात जे जे नागरिक आलेले आहेत त्यांनी त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली कोरोना चाचणी करण्यास समोर यावे असे आव्हान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत वाघ व गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांच्याकडून करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे नगर पंचायत प्रशासनाने आता सक्रिय होऊन शहरांमध्ये रुग्ण वाढ होणार नाही याकरिता युद्धस्तरावर कार्य करण्याची गरज आहे त्यात निर्जंतुकीकरण करणे, सँनिटायझरींग फवारणी करणे, स्वच्छता काम करणे,सांडपाणी व्यवस्थापन करणे, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि जनता कर्फू सुद्धा करावे. तेव्हा खरच कोरोना वर अंकुश लावण्यास यश येईल.आता नागरिकांनी सुद्धा कोरोना काळात स्वतःची खबरदारी घ्यावी नेहमी विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.नेहमी मास्क वापरावे, वेळोवेळी साबणाने हातकिंवा धुवावे,त्याच बरोबर सर्दी, खोकला किंवा ताप किंवा काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून आपली तपासणी करून घ्यावी असे सुद्धा यावेळी आव्हान संबंधीत आधीकारी कडुन करण्यात आले.