तिघांची कोरोनावर मात तर दोन बाधित रुग्ण आढळले आजपर्यंत २४५ रूग्णांची कोरोनावर मात जिल्ह्यात प्रतिबंधित क्षेत्र ५८

0
112

 

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत…
गोंदिया दि.४ (जिमाका) जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत असतांना दिसत आहे. गोंदियाच्या विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज ४ ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात दोन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे निदान झाले.तर तीन रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले.आज जे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या ४१० झाली आहे.

दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांमुळे कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या १४२ वर पोहचली आहे.आज आढळलेले दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे देवरी तालुक्यातील नवाटोला येथील आहे.

कोरोनावर मात करून आज घरी परतलेल्या तीन रुग्णापैकी अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी येथील एक रुग्ण,सालेकसा तालुक्यातील सीतेपारचा एक रुग्ण आणि एक रुग्ण तिरोडा शहरातील आहे.त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २४५ झाली आहे.

गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण १००१९ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये ९८९४ नमुने निगेटिव्ह आढळून आले .३९२ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.१२५ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे.तर १४१ नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता कायम आहे.

जिल्ह्यातील रहिवासी असलेले चार कोरोना बाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे.गोंदिया येथील प्रयोगशाळेतून ३९२ आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून चौदा असे एकूण ४१० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात २२१ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ८२६ व्यक्ती अशा एकूण १०४७ व्यक्ती विलगिकरणात आहे. ह्या सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर उपचार करीत आहे.

बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २७८२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये २७६८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर १४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १५४ चमू आणि ७२ सुपरवायझर ५८ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.

जिल्ह्यातील ज्या गावात आणि आणि नगर पालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण ५८ क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र आहे.यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला,कुडवा,गोंदिया येथील यादव चौक,सिव्हिल लाईन, रेल्वे लाईन,श्रीनगर व सिंधी कॉलोनी. सालेकसा तालुक्यातील भजेपार, पाउलदौना,रामाटोला व तितेपार. देवरी तालुकयातील आखरीटोला भागी,परसटोला,गरवारटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक ५,८,९,१० .सडक/अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला,डव्वा व काटेकुर्रा.गोरेगाव तालुक्यातील घोटी.

तिरोडा तालुक्यातील वडेगाव, मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली, लोणार,खैरबोडी,गुमाधावडा,
गोंडमोहाडी,पाटीलटोला,इसापूर,
सेजगाव,पालडोंगरी,पिपरिया, उमरी,
पांजरा,तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड,किल्ला वार्ड, नेहरू वार्ड,गुरुदेव वार्ड,महात्मा गांधी वार्ड,,रवींद्र वार्ड,लक्ष्मी वार्ड व न्यू बेलाटी/खुर्द. मुंडीकोटा रेल्वे स्टेशन व बयाबाब(मुंडीकोटा).

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव आणि आमगाव तालुक्यातील तिगाव आणि चिरचाळबांध आदी गावे आणि वार्ड कंटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे.

*काळजी घ्या*
*अंतर ठेवा*
*मास्क बांधा*
*सुरक्षित राहा*