अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व संघानूशासक सदानंदजी महास्थविर यांचे दुःखद निधन

380

 

सुनील उत्तमराव साळवे(9637661378)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर 4 आँगस्ट 2020
अखिल भारतीय भिख्खू संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सदानंद जी महस्थविर यांचे आज दुपारी नागपूरच्या संघर्ष नगरातील संघाराम बुद्ध विहारात निधन झाले.
भन्तेजी 81 वर्षांचे होते. त्यांनी 1963 ला श्रामनेर म्हणून दीक्षा घेतली. ते मूळ भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याच्या वीटगाव येथील मूळचे रहिवाशी. त्यांनी आपला संपूर्ण कार्यकाल वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील केळझर या गावातील ऐतिहासिक धम्मरजीक बुद्ध विहार बांधण्यात घालविला. आज तिथे भव्य ऎतिहासिक विहार आहे.
महास्थवीर सदानंदजी ह्यांनी आत्तापर्यंत अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे भाषांतर व लेखन केलेले आहे.
उद्या 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता संघाराम बुद्ध विहार संघर्ष नगर येथून त्यांची अंतिम यात्रा केळझर साठी वर्धारोड मार्गाने रवाना होऊन 5 वाजता अंत्यसंस्कार होईल.