२ वर्षाच्या मुलावर,२७ वर्षाच्या नराधमाचा अनैसर्गिक बलत्कार,चिमूर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार घेण्यास अनकानी… — टेकेपार येथील घटना..प्रकरण दडपण्यासाठी एका राजकीय नेत्याचा दबाव! — चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ ‌महेश्वर रेडी यांच्या सोबत घटनाक्रमा बाबत साधला संवाद..

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुका आहे.चिमूर तालुका अंतर्गत मौजा टेकेपार आहे.या टेकेपार मध्ये आज दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान एका २ वर्षाच्या मुलावर,त्याच गावातील २७ वर्षीय नराधमाने स्वत:च्या घरात नेवून अनैसर्गिक बलत्कार केला असल्याची गंभीर घटना घडली आहे.
२ वर्षीय बालक हा घराशेजारील परिसरात खेळत असताना,त्याला २७ वर्षीय नराधमाने आपल्या घरी नेले व बालकाचे कपडे काढून,त्याच्या गुरुद्वारा अंतर्गत अनैसर्गिक बलत्कार केला.
प्रत्यक्ष बलत्कार करताना एका मुलीने पाहिले व लागलीच बालकाच्या आईला ती मुलगी घटनाक्रम सांगू लागली.घटनाक्रम ऐकताच आईने बलत्कार करीत असलेल्या मुलाच्या घराकडे धाव घेतली व स्वत:च्या २ वर्षाच्या मुलांवर,२७ वर्षीय युवक अनैसर्गिक बलत्कार करीत असताना प्रत्यक्ष बघीतले,सोबत घटनाक्रम बघितलेला एक साक्षदार आहेच.
लैंगिक अत्याचार प्रकरणी २ वर्षाच्या चिमुकल्याला घेवुन आई-वडील चिमूर पोलिस स्टेशन येथे आले असता,अत्याचार प्रकरणी तात्काळ तक्रार नोंदवून घेण्यास कुचराई करीत असल्याचे अत्याच्यारग्रस्त तानुल्याच्या नातेवाईकांनी,”दखल न्युज,चे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधताना सांगितले.
या संवादातंर्गत एक राजकीय व्यक्ती अत्याचार प्रकरणात ढवळाढवळ करीत असून,”अत्याचार संबंधात,”तक्रार,नोंदवून घेवू नये,असा दबाव टाकत असल्याचे सुध्दा सांगितले.
दखल न्युजचे मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके यांनी घटनेची गंभीर दखल घेत,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी यांच्यासोबत अत्याचार प्रकरणा संबंधात भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधला आहे.