आंतर मशागतीच्या कामांना वेग: गावागावात मजूर मिळणे झाले कठीण, अनेकांनी वाढविली मजुरी मजुरी महागल्याने तणनाशकांचा वापर वाढला

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर :-यंदा परीसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांमधील तणांचे प्रमाण वाढले आहे मजुरांचा तुटवडा असल्याने शेतकरी तणनाशकांचा वापर करीत आहेत.सध्या आंतर मशागतीच्या कामांना वेग आल्याने गावागावात मजूर मिळणे झाले कठीण झाले आहे. अनेकांनी मजुरीही वाढवली पण मजुर मिळेनासे झाले आहेत.
तालुक्यात शेतकरी सोयाबीन तसेच कपाशीवर मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा तणनाशकाचा वापर करीत आहे खरिपाच्या पेरणीला सुरुवात झाल्यापासून मध्यंतरीच्या 20 ते 25 दिवसांचा काळ वगळता पावसाचे प्रमाण चांगले आहे त्यामुळे पेरणी आटोपून डवरणी व निंदनाच्या कामाला वेग आला पडणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये चिखल होत आहे त्यामुळे तणांचा वाढता प्रभाव झाल्याने व सर्व ठिकाणच्या निंदनाला सुरुवात झाल्याने एकाच वेळी एवढ्या मजुरांची ची उपलब्धता होत नसल्यामुळे मजूर वर्गाने आपली मजुरी वाढून मागायला सुरुवात केली आहे त्यामुळे मजुरीचे दर वाढले आहेत आणि तणांची वाढ मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याला काढण्यासाठी पैसा खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडायला लागले आहे. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च हा नींदनावर करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी तणनाशक आकडे आपला मोर्चा वळविला आहे बहुतांश शेतकरी आपल्या शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करून तणावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही शेतकरी आपल्या परंपरागत निधनाचे कामाला प्राधान्य देत चढ्या मजुरीने निंदन सुरू केलेले दिसत आहे. तर काही शेतकरी हे अजून काही दिवसांनी मजुरीचे दर कमी झाल्यानंतर निंदनाच्या कामाला सुरुवात करू या आशेवर आहेत. तननाशकामुळे पिकांवर परिणाम होते हे कळत असूनही नाईलाजाने तणनाशकाचा वापर सुरू केला आहे. विविध पिकांप्रमाणे शेतकरी बांधवांना त्यानुसार तणनाशकाची फवारणी ही करावी लागत आहे तर या फवारणी करिता फवारणी करणाऱ्या मजुरांचे दरही वाढले आहेत त्यामुळे आर्थिक ताण येत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206