दिक्षा अवचार आत्महत्या प्रकरणी आरोपीला अटक करावी वंचित आघाडीचे एस डी पी ओ यांना निवेदन मंगरुळपीर तालुक्यातील चांधई येथील प्रकरण

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर-तालुक्यातील चांधई येथील रहिवासी असलेले वैभव संजय ठाकरे यांनी पिडीत मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापासून प्रेमसंबंध ठेवले व लग्नाला नकार दिला परिणामी सदर मुलीने आत्महत्या केली ही बाब गंभीर असून पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने दि 4 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे देण्यात आलेल्या लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनाचा आशय असा की,सदर मुलीने वैभव ठाकरे यास लग्नाची गळ घातली असता त्यांनी त्याला स्पष्टपणे लग्नाला नकार दिला त्यामुळे पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला तिच्या आत्महत्येस वैभव ठाकरे हा जबाबदार असल्यामुळे आरोपी विरुद्ध मंगरूळपीर पोलीस स्टेशन मध्ये भां.द.वी.कलम 306 तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केलेला आहे परंतु या प्रकरणातील आरोपी हा अध्यापही मोकाट असून फरार आहे त्यास तात्काळ अटक करून पीडित तरुणीला व त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अन्यथा आरोपीला त्वरित अटक न झाल्यास वंचित बहुजन आघाडी ला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा निवेदनातुन दिला आहे. या निवेदनावर मंगरूळपीर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सौरभ सपकाळ,गजानन इंगोले,विनोद भगत,जनार्दन बेलखेडे,किसनराव खाडे,समाधान भगत,गौतम खाडे,दिलीप बजरंग इंगोले आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206