पणज व अकोली जहाॅगीर येथे अकोट ग्रामीण पोलिसांचे पथसंचलन

153

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

पणज आकोट तालुक्यातील ग्राम पणज येथे आगामी सण उत्सवा दरम्यान व राम मंदिर भूमिपूजन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगानेआकोट ग्रामीण पोलीस आर सी पी जवानांनी सोमवारी पथसंचालन केले.आगामी सण उत्सवाला सुरुवात झाली असून सदर सण उत्सव कोरोना च्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी घरच्या घरीच साजरे करावे तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता कायदा व सुवयवस्था अबाधितराहण्यासाठी जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे,आवाहन आकोट ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी केले आहे. सदर पथसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामीण पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड उपनिरीक्षक धर्माजी डाखोरे यांच्या उपस्थितीत कर्मचारी व आर सी पी जवानांनी गावातील मुख्य मिरवणूक मार्गाने पथसंचलन केले या वेळी पणज येथील सरपंच प्रदिप ठाकुर व पत्रकार संजय गवळी उपस्थित होते.