पेढी नदीच्या पुरात वाहून गेलेला तिसरा युवक अजूनही बेपत्ता, ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध सुरु, पुरात चारजण वाहून गेले होते

0
169

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दि 2 ऑगस्टला पेढी नदीला आलेल्या पुरात आमला येथील विनायक कोरे, सतिश भुजाडे, पद्माकर वानखडे, व अंकुश सगणे हे रात्री 11 वाजताच्या सुमारास आपापल्या घरी जात असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले होते विनायक कोरे झाडाला अडकल्याने बचावला तर तिघेजण वाहून गेले होते त्यापैकी अंकुश सगणेचा मृतदेह काल बचाव पथकास घटनास्थळापासून 500 मिटर अंतरावर सापडला होता तर पद्माकर वानखडेचा मृतदेह हा वलगावनजिक आढळून आला
मात्र सतिश भुजाडेचा मृतदेह बचाव पथकास अद्यापही आढळून आला नाही(वृत्त लिहिपर्यंत)बचाव पथकाचे कर्मचारी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सतिश भुजाडेच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत