संपुर्ण लाॅकडाउनचा कालावधी पुर्ण होत नाही तोपर्यंतचे गोरगरीब जनतेचे विजबिल माफ करा पवन आगदारी चंद्रपर जिल्हा काॅग्रेस कमेटी जिल्हाअध्यक्ष एससी सेल यांची मागणी

0
134

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
सध्या कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील लाॅकडाउन वाढतच चालले आहे. अनेक जिल्हातही लाॅकडाउन वाढतच चालले आहे. त्यामुळे हाताला काम नसल्याने गोरगरीब, शेतमजुर, कामगार यांचे वर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे संपुर्ण लाॅकडाउनचा कालावधीत येनारे विजबिल भरने शक्य नसल्याने गोरगरीब जनतेचे विजबिल महाराष्ट्र शासना ने माफ करावे अश्या मागणीचे निवेदन चंद्रपुर जिल्हाअधिकारी यांना पवन आगदारी चंद्रपुर काॅग्रेस कमेटीचे जिल्हाअध्यक्ष एससी सेल यांनी दिले आहे.

निवेदन देतांना चंद्रपुर पंस माजी सभापती रोशन पचारे, महाराष्ट्र काॅग्रेस कमेटी उपाध्यक्ष एससी सेल अश्विनी खोब्रागडे,चंद्रपुर युथ काॅग्रेस कमेटी सचिव सुरज कन्नुरी, घुग्घुस काॅग्रेस कमेटी अध्यक्ष एससी सेल सुरज बहुराशी, घुग्घुस काॅग्रेस कमेटी अध्यक्ष किसान सेल प्रशांत सारोकर, घुग्घुस युथ काॅग्रेस कमेटी अध्यक्ष तौफीक शेख, प्रेमानंद जोगी ग्रापं सदस्य उसगाव, काॅग्रेसचे जेष्ठ नेते शेखर तंगलपेल्ली, घुग्घुस युथ काॅग्रेस कमेटी उपाध्यक्ष सिनु गुडला उपस्थित होते.