खेड तालुक्यातील शिरगाव मधील मुख्य रस्त्याला जोडणारा पूल गेला वाहून

230

 

प्रतिनिधी : प्रसाद गांधी.

खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिरगांव गावांमध्ये झालेल्या ढगफुटी मुळे अतिशय बिकट व दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.गावात येणारा रस्ता सात ते आठ ठिकाणी खचल्याने मेन पूल वाहून गेल्याने शेजारील खोपी गावाशी व गावातील वाडी वाडीतील असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सर्व बाजूंनी डोंगर खचले आले आहेत.घरांना धोका निर्माण झाला आहे.माणसं घर सोडून गावमंदिर व इतर ठिकाणी रात्र जागून काढत आहेत.वीज आणि नेटवर्क नसल्याने कोणाशीही संपर्क होत नाही.नदीने पात्र बदलल्याने आजूबाजूची शेती वाहून गेली आहे व इतरही शेतीचे भरपूर नुकसान झाले आहे.
4 लोखंडी पूल, 3 स्मशान भूमी, 3 बोअर वेल, 1विहीर अक्षरशः वाहून गेलेत.हे सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या लक्षात आणून देखील शासनाकडून कोणतीही मदत तर नाहीच,परंतु साधी पहाणी सुद्धा करायला अद्याप कोणीही आलेले नाहीत.अशा परिस्थतीमध्ये प्रशासनाची वाट न पाहता गावचे युवा प्रतिष्ठानचे तरुण,उपसरपंच,ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि इतर ग्रामस्थ जीवाची पर्वा न करता पुढे सरसावून गावच्या मदतीसाठी आले आहेत.तरी शासनाचे अधिकारी यांनी लवकरात लवकर येवुन झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात यावा ही समस्त शिरगाव वासीय विनंती करत आहेत.

*दखल न्यूज भारत*