पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सन साजरा केला.

 

 

निरा नरसिंहपुर दिनांक 4 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार 

कोरोना सारख्या गंभीर संकटात सुद्धा आपल्या प्राणांची चिंता न करता आपल्या सेवेत स्वतःला समर्पित करून सेवा देणाऱ्या योद्यांना रक्षाबंधन निमित्त जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला, त्यांचा सन्मान केला.

देशभर कोरोनाचे संकट  गंभीर होत असून  तरीदेखील  या गंभीर परिस्थितीत  ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस हे कर्तव्य बजावत आहेत. कोरोना महामारी पासून नागरिकांची रक्षा करणाऱ्या चेक पोस्ट वरती व सर्वत्र आपल्या परिवारा पासून दूर आपली ड्युटी करण्यासाठी कर्तव्य पार पाडत असलेल्या इंदापूर पोलीस स्टेशन येथील पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, पोलीस बांधव यांना राखी बांधून हा रक्षाबंधनचा सण साजरा केला.

जनतेचे प्रतिनिधी प्रत्यक्षात पोलीस स्टेशनमध्ये येऊन आपला सन्मान करत असल्याने प्रत्यक्षदर्शी पोलीस कर्मचारी देखील या अनोख्या रक्षाबंधनाने भारावून गेले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160