माहूर तालुक्यात सहा रुग्ण कोरोना ग्रस्त.

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे )

यवतमाळ येथून माहूर तालुक्यातील लखमापूर येथे आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील अन्य 5 रुग्णांचा अहवाल आज दि.4 ऑगस्ट रोजी पॉज़िटिव आल्याने संक्रमीत रुग्णांची संख्या 6 वर गेली आहे.
तालुक्यातील लखमापूर येथे यवतमाळ येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्याच्या घरातील अन्य 5 लोक या आजाराने संक्रमीत झाले आहेत. प्रशासनाने लखमापूर तांड्याला प्रतिबंधित क्षेत्र घोषीत केले आहे.यवतमाळ येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने 19 व्यक्ती (त्यातील बुलढाणा बँक माहूरचे 5 कर्मचा-यांचा समावेश ) हायरिस्क मध्ये तर 34 व्यक्ती लो रिस्क मध्ये असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.साहेबराव भिसे व ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले यांनी दिली.