वेलगुर येथील जि.प.शाळेच्या नवीन दोन वर्गखोली व संरक्षणभिंतीचे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन. प.स.सभापती व उपसभापती यांची प्रमुख उपस्थिती

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती अहेरी अंतर्गत ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर येथे जिल्हा परिषद शाळा असून या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यतचे शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. मात्र या शाळेत वर्गखोलीची कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे सदर वर्गखोलीविषयी मागणी केली असता मागणीची पूर्तता करत जि.प. अध्यक्षांनी सन २०१८-१९ व २०१९-२० जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधीतून नविन दोन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या बांधकाम पूर्ण पणे झाले आहे. तसेच १३ वने महसूल योजने अंतर्गत शाळेसाठी संरक्षण भितीचे बांधकाम करण्यात आले असून अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
सदर उदघाटनला पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, माजी सरपंच कुसुम दूधि, सरपंच लालू करपेत, माजी उपसरपंच उमेश मौहूर्ले, शा.व्य.समिती अध्यक्ष दिलीप राऊत, तानबोडीचे माजी उपसरपंच अशोक येलमूले, मुख्याध्यापक कुसनाके , साईनाथ नागोसे, विलास शेंडे, प्रवीण रेशे, किशोर वसाके, हरी आत्राम, रोहित गलबले, राहुल ओंडरे, प्रशांत गोडसेलवार, राकेश सड़मेक यांच्यासह गावकरी उपस्थित होते.