आरमोरी नगरात मोबाईलवर देशी-विदेशी दारूची विक्री? — दारूची घरपोच सेवा सुरू असल्याची जनमानसात खमंग चर्चा,पोलिस हतबल..?

519

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली दि. ४ अगस्ट:-
आरमोरी हे शहर शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जातय.याच बरोबर इथं मोठी बाजारपेठ आहे.पण,आरमोरी शहरात कोविद19 चालू असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी,मोहफुलाची दारू विक्री जोमात केली जात असल्याचे चित्र आहे.
आजच्या स्थितीत लोकांना,रोजगार नसल्यामुळे घरोघरी भांडण होत असल्याची विदारक स्थिती बोलकी आहे.परत मद्यशौकीनामुळे व इतर कारणांमुळे आरमोरी शहराची कायदा व सुव्यवस्था दिवसागणिक बिघडली असल्याचे जनमानसात बोलल्या जात आहे.
काही दिवसांपूर्वी तेंदूपत्ता रक्कम म्हणून नाका बंदी अंतर्गत मोठी रक्कम पोलिसांचे हाती लागली.परंतू सीमा बँड अडताना आरमोरी शहरातत देशी,विदेशी व मोहफुल दारू पोहचते कशी?हा प्रश्न आरमोरी वासीयांना भयंकर सतावतो आहे.
आरमोरी येथील दारू सम्राट यांचेवर दारुबंदी अंतर्गत आरमोरी पोलीस ठाणे,तसेच जिल्हा बाहेरील पोलीस ठाणे इथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.त्यांच्यावर अजून पर्यन्त मोक्का कारवाई का होत नाही.तसेच ते राजरोस पणे अजूनही मोठ्या प्रमाणात दारू विक्री कोणाचे आशीर्वादाने करीत आहेत?हा मुद्दा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी हाताळावे,असी भावना आरमोरी वासीयांची आहे.
आरमोरी येथील भगतसिंग चौकात एक इसम मोबाईल द्वारे देशी दारू बुक करतो व देशी विदेशी दारु घरपोच व जिथं बोलावलं तिथं,आपल्या सोबत्याद्वारे पाठवितो.”तो,दररोज 3 ते ४ विदेशी दारू पेठ्या खपवितो असे बोलल्या जाते.सर्वसामान्यांना या बाबत कल्पना आहे,पण पोलिसांना याची खबर नाही का?पोलिसांचा गोपनीय विभाग काय करतो?हे कोडे पोलिसांनाच माहिती.
मात्र,आरमोरी पोलिस विभागाचे अवैध दारू विक्रेत्यांकडे होणारे दुर्लक्ष,समाज व्यस्थेला जर्जर करून सोडणारे आहे एवढे नक्की!