Home Breaking News महादुला नगरपंचायत मध्ये होणाऱ्या कोरोना टेस्ट संशयाच्या घेऱ्यात कोणाला पाँजिटीव आणि...

महादुला नगरपंचायत मध्ये होणाऱ्या कोरोना टेस्ट संशयाच्या घेऱ्यात कोणाला पाँजिटीव आणि कोणाला निगेटिव्ह ठरविणे हे आता लैब असिस्टंट व डॉक्टर्स यांच्या हातात?

1021

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी / नागपुर: ४ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत येथे सध्या सुरू असलेल्या कोव्हीड १९ कोरोना च्या टेस्ट संशयाच्या घेऱ्यात सापडल्या असुन या टेस्ट घेतल्यानंतर त्याची लैब डॉक्टर्स, लैब असिस्टंट खरोखरच टेस्ट करतात की कोणालाही पाँजिटीव आणि कोणाला निगेटिव्ह करतात? यांवर उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
येथील कोराडी काँन्ट्रक्टर असोशियन चे अध्यक्ष रत्नदीप रंगारी यांची दि २९ जुलै रोजी कोरोना टेस्ट झाली असता त्यांना पाँजिटीव डिक्लेअर केले परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना एम्स मध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या सर्व टेस्ट केल्या गेल्या त्यात ते निगेटिव्ह निघाले असे रत्नदीप रंगारी (माजी नगरसेवक) यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ह्या टेस्ट खरोखरच केल्या जातात का की कोणालाही जबरदस्ती पाँजिटीव ठरवुन त्याला सार्वजनिक व सामाजिक जीवनातून बदनाम व उठवण्याचा शासन व प्रशासन प्रयत्न करीत असावे असा आरोप रत्नदीप रंगारी यांनी दखल न्यूज भारत शी बोलताना सांगितले. रत्नदीप रंगारी यांना दुसऱ्याच दिवशी एम्स हाँस्पिटल मधुन सुट्टी सुद्धा देण्यात आली. त्यांना सर्दी, खोकला आणि ताप नव्हता. त्यांना कुठलेही सिम्टंन्स नसतांना त्यांना येथील सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांच्या ईशाऱ्यावर तर पाँजिटीव डिक्लेअर केले नसावे असे त्यांना वाटते.
तर दुसरीकडे एका दुध डेअरी च्या संचालिका यांनी सुद्धा दखल न्युज भारत शी बोलताना आरोप केला कि त्यांच्या मुलीला कोणतेच सिम्टंन्स नव्हते. सर्दी खोकला ताप काही नसतांना तिला पाँजिटीव कसे काय डिक्लेअर केले? आम्ही घरचे सारे निगेटिव्ह आणि ती एकटीच कशी पाँजिटीव? कुठेतरी आम्हाला आमच्या मुलीला नगरपंचायत महादुला येथे बदनाम केले जात आहे. असेही त्यांनी सांगितले.तर दुसरीकडे त्याच दिवशी एकाच घरातील दोन भावांची टेस्ट केली असता त्यापैकी ज्याला ताप आणि खुपच खोखला होता तो निगेटिव्ह निघाला आणि ज्या भावाला खोखला, ताप किंवा सर्दी नव्हती तो पाँजिटीव कसा निघाला? असेही त्यांनी प्रश्न उचलला आहे.
एकंदरीत या साऱ्या टेस्ट चे रिपोर्ट बघुन सध्या तरी नगरपंचायत महादुला येथे होणाऱ्या कोरोना टेस्ट सध्या संशयास्पद वाटतात. मेयो लैब मध्ये कार्यरत डॉक्टर व लैब असिस्टंट खरोखरच या सैंपल ची टेस्ट करतात की जाणुनबुझुन कोणाच्या राजकीय इशाऱ्यावर टार्गेट बनवुन बदनाम केले जात आहे? या सैंपल ला हात न लावता व टेस्ट ना करताच रिपोर्ट मध्ये पाँजिटीव तर लिहिले जात नसावे? अशा टेस्ट रिपोर्ट व लैब ची जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र ठाकरे , नागपुर तसेच मनपा आयुक्त तुकाराम मुंडे, तसेच नागपुर पोलीस आयुक्त यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

Previous articleअखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या विभागीय अध्यक्ष पदी श्री मारुती सांगळे यांची निवड
Next articleआरमोरी नगरात मोबाईलवर देशी-विदेशी दारूची विक्री? — दारूची घरपोच सेवा सुरू असल्याची जनमानसात खमंग चर्चा,पोलिस हतबल..?