अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या विभागीय अध्यक्ष पदी श्री मारुती सांगळे यांची निवड

बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील श्री संत वामनभाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यनगरी श्री क्षेत्र गहिनीनाथ गड,चिंचोली येथील भूमिपुत्र आणि शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व सध्या ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेले श्री मारुती सांगळे यांची निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष मा श्री धनराजजी गुट्टे यांनी ही जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश कार्यकारिणी च्या मार्गदर्शनाखाली आपण समाजातील वंचित,दुर्लक्षित घटकांसाठी तसेच मोठया प्रमाणात नोकरी व उद्योग व्यवसायाच्या शोधात वाढत चाललेल्या बेरोजगारीमुळे आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात संधी न मिळाल्यामुळे भरकटत चालली आहे.त्यांना नोकरी व उद्योग व्यवसायात योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील यशवंताकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे,मेळावे ग्रामीण व शहरी भागात आयोजित करून युवा पिढीला आपापल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री मारुती सांगळे यांना पूर्वीपासूनच समाजसेवेची आवड आहे. त्यांनी वैराग्याचे महामेरू श्री संत वामनभाऊ यांच्या सामाजिक,धार्मिक कार्यावर प्रकाशझोत टाकणारे पुण्यतिथी विशेषांक काढले होते. त्या विशेषांकाचे प्रकाशन स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब व स्व विलासराव देशमुख साहेब या दोन लोकनेत्याच्या शुभहस्ते प्रकाशन करण्याचा योग श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे मिळाला.त्याचबरोबर सध्या ठाणे जिल्ह्यात बदलापूरस्थित असल्याने तेथे श्री संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांची संयुक्त पुण्यतिथी महोत्सव पहिल्यांदाच तेथील सर्व समाजबांधवांना एकत्रित करून अतिशय उत्सवात साजरा केला. त्याचबरोबर श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे सर्व सहकारी मित्रांच्या मदतीने लोकचळवळ उभी करून लोकवर्गणीतून झाडे लावून त्यांचे 100% संवर्धन करत आहेत. डोंगररांगावर,पडीक जमिनीत विविध प्रकारच्या झाडांच्या बिया लावणे असे पर्यावरण संरक्षनाच्या दृष्टीने उपक्रम राबवित असतात.
या निवडीबद्दल संघटनेचे अध्यक्ष श्री धनराज गुट्टे प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र घुगे, युवा आघाडीचे प्रदेशअध्यक्ष श्री बाळासाहेब सानप,मुंबई अध्यक्ष श्री रामकृष्ण गीते,व इतर प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.